पोलिसांवरील ताण कमी करा -वेटम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:24 AM2021-04-13T04:24:56+5:302021-04-13T04:24:56+5:30
सांगली : पोलिसांना कुटुंब व स्वत:च्या स्वास्थ्याचा विचार न करता सलग अनेक तास बंदोबस्त करावा लागत आहे. पोलिसांवरील हा ...
सांगली : पोलिसांना कुटुंब व स्वत:च्या स्वास्थ्याचा विचार न करता सलग अनेक तास बंदोबस्त करावा लागत आहे. पोलिसांवरील हा ताण कमी करावा, अशी मागणी रिपब्लिकन स्टुडंट युनियनचे महासचिव अमोल वेटम यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे.
त्यांनी म्हटले आहे की, इतर विभागातील सरकारी कर्मचारी, अधिकारी हे आठ तास काम करून लाखो रुपये पगार घेत आहेत. पोलिसांना वेळेचे बंधन नाही. ते आठ तासांहून अधिक काम करीत आहेत. याचा मोबदलादेखील शासनाकडून मिळत नाही. त्यांना होणाऱ्या मानसिक, शारीरिक त्रासाबाबत सरकारने गंभीरपणे विचार करावा, प्रामाणिकपणे काम करणाऱ्या पोलिसांना सरकारने तात्काळ आर्थिक मदत करावी, आठ तासांपेक्षा जास्त काम लावू नये, तसेच त्यांच्यावर लॉकडाऊनच्या माध्यामातून पडत असलेल्या मानसिक, शारीरिक त्रासाचा विचार व्हावा.