सांगोल्यातील शिक्षकाने बेवनूरमधील शाळेमधून पळवले रजिस्टर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2019 11:25 PM2019-08-14T23:25:56+5:302019-08-14T23:30:28+5:30
वाघमारे यांनी रजिस्टरमध्ये खाडाखोड करून दाखला देण्यास नकार दिल्याने त्याने ९ आॅगस्टरोजी रात्री शाळेचा दरवाजा मोडून व कपाट तोडून रजिस्टर चोरून नेऊन नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
जत : बेवनूर (ता. जत) येथील जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळेतील जनरल रजिस्टरची चोरी करून नेल्याच्या आरोपावरून शिक्षक आबासाहेब भिकू कोळी (वय ३५, सध्या रा. कडलास, ता. सांगोला, जि. सोलापूर) याच्याविरोधात मुख्याध्यापक नितीन वाघमारे यांनी जत पोलिसात फिर्याद दिली आहे.
आबासाहेब कोळी हा लक्ष्मीदेवी विद्यालय सोनंद (ता. सांगोला, जि. सोलापूर) येथे शिक्षक म्हणून तात्पुरती नोकरी करत आहे. कायम नोकरीसाठी त्याला ‘महादेव कोळी’ अशा जातीच्या दाखल्याची आवश्यकता होती. त्यामुळे त्याने मुख्याध्यापक नितीन वाघमारे यांना तसा दाखला द्यावा, अशी विनंती केली होती, वाघमारे यांनी रजिस्टरमध्ये खाडाखोड करून दाखला देण्यास नकार दिल्याने त्याने ९ आॅगस्टरोजी रात्री शाळेचा दरवाजा मोडून व कपाट तोडून रजिस्टर चोरून नेऊन नेल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे.