जिल्ह्यातील २९२४ शेतकऱ्यांची द्राक्ष निर्यातीसाठी नोंदणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2020 05:04 AM2020-12-05T05:04:12+5:302020-12-05T05:04:12+5:30
जिल्हयात २८ हजार हेक्टर द्राक्षबागांचे क्षेत्र आहे. जिल्ह्यामधून गेल्यावर्षी युरोपियन देशात आठ हजार ४८४ टन, तर इतर देशात नऊ ...
जिल्हयात २८ हजार हेक्टर द्राक्षबागांचे क्षेत्र आहे. जिल्ह्यामधून गेल्यावर्षी युरोपियन देशात आठ हजार ४८४ टन, तर इतर देशात नऊ हजार ७७० टन द्राक्षे निर्यात झाली आहेत. शेतीमाल निर्यातीमध्ये विशेषतः जिल्ह्यातून द्राक्ष पिकाची दरवर्षी वाढ होत आहे. यावर्षी दाेन हजार ९२४ शेतकऱ्यांनी दि. २ डिसेंबरपर्यंत द्राक्ष निर्यातीसाठी नोंदणी केली होती. शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद लक्षात घेऊन कृषी विभागाच्या शेतकऱ्यांनी द्राक्ष निर्यातीसाठी नोंदणी करण्याची मुदत दि. २० डिसेंबरपर्यंत वाढविली आहे. या मुदतीमध्ये शेतकऱ्यांनी द्राक्ष निर्यातीची नोंदणी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडे करावी, असे आवाहनही कृषी विभागाच्या शेतकऱ्यांनी केले आहे.