सांगली सिव्हिलमधील नियमित शस्त्रक्रिया सोमवारपासून बंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2025 18:30 IST2025-03-08T18:30:04+5:302025-03-08T18:30:22+5:30
सांगली : येथील पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयात एकूण सात शस्त्रक्रियागृहे कार्यरत आहेत. त्यापैकी पाच शस्त्रक्रियागृहांचे नूतनीकरण करण्याचे काम ...

सांगली सिव्हिलमधील नियमित शस्त्रक्रिया सोमवारपासून बंद
सांगली : येथील पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयात एकूण सात शस्त्रक्रियागृहे कार्यरत आहेत. त्यापैकी पाच शस्त्रक्रियागृहांचे नूतनीकरण करण्याचे काम सोमवार, दि. १० मार्चपासून सुरू करण्यात येणार आहे. त्याकरिता अंदाजे सहा महिने इतका कालावधी लागणार आहे. या कालावधीत या रुग्णालयातील नियमित शस्त्रक्रिया बंद राहतील, असे रुग्णालयाच्या प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
सांगलीतील वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयात सांगली, कोल्हापूर, सातारा, सोलापूर या जिल्ह्यासह कर्नाटक सीमा भागांतील रुग्ण मोठ्या संख्येने येत आहेत. पाच शस्त्रक्रिया विभागांचे नूतनीकरण करण्यात येणार आहे. यामुळे या पाच विभागांतील शस्त्रक्रिया विभाग सहा महिन्यांसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत.
या ठिकाणच्या नियमित शस्त्रक्रिया शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, मिरज येथे सुरू राहतील. तातडीच्या शस्त्रक्रिया नेहमीप्रमाणे वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयातील दोन शस्त्रक्रियागृहात सुरू राहतील, असे पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे कळविले आहे.