सांगली जिल्ह्यात एक लाख सत्तर हजारहून अधिक व्यक्तींचे पुनर्वसन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2019 06:50 PM2019-08-12T18:50:32+5:302019-08-12T18:56:59+5:30
सांगली जिल्ह्यात निर्माण झालेली पूरस्थिती हाताळण्यासाठी पालकमंत्री सुभाष देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासनाचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. दि. 12 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत जिल्ह्यातील एकूण 104 पूरबाधित गावांतील सुमारे 34 हजार 593 कुटुंबांतील 1 लाख, 73 हजार 584 लोक व 42 हजार 494 जनावरे यांचे तात्पुरत्या स्वरूपात पुनर्वसन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.
सांगली : सांगली जिल्ह्यात निर्माण झालेली पूरस्थिती हाताळण्यासाठी पालकमंत्री सुभाष देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासनाचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. दि. 12 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत जिल्ह्यातील एकूण 104 पूरबाधित गावांतील सुमारे 34 हजार 593 कुटुंबांतील 1 लाख, 73 हजार 584 लोक व 42 हजार 494 जनावरे यांचे तात्पुरत्या स्वरूपात पुनर्वसन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.
जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, मिरज तालुक्यातील 20 गावांतील 10 हजार 476 कुटुंबांतील 52 हजार 514 लोक व 12 हजार 661 जनावरे यांचे तात्पुरत्या स्वरूपात पुनर्वसन करण्यात आले आहे. पलूस तालुक्यातील 25 गावांतील 7 हजार 651 कुटुंबांतील 37 हजार 720 लोक व 11 हजार 251 जनावरे यांचे तात्पुरत्या स्वरूपात पुनर्वसन करण्यात आले आहे.
वाळवा तालुक्यातील 37 गावांतील 12 हजार 256 कुटुंबांतील 65 हजार 547 लोक व 15 हजार 135 जनावरे यांचे तात्पुरत्या स्वरूपात पुनर्वसन करण्यात आले आहे. शिराळा तालुक्यातील 21 गावांतील 653 कुटुंबांतील 3 हजार 182 लोक व 2 हजार 727 जनावरे यांचे तात्पुरत्या स्वरूपात पुनर्वसन करण्यात आले आहे. महानगरपालिका क्षेत्रातील 3 हजार 557 कुटुंबांतील 14 हजार 621 लोक व 720 जनावरे यांचे तात्पुरत्या स्वरूपात पुनर्वसन करण्यात आले आहे.