वाळवा-शिराळ्यात ‘स्वाभिमानी’ची पुनर्बांधणी : शेतकरी नेत्यांमधील संघर्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2018 11:52 PM2018-04-14T23:52:13+5:302018-04-14T23:52:13+5:30

इस्लामपूर : राज्यातील शेतकरी चळवळीला पुन्हा धार आणण्यासाठी खासदार राजू शेट्टी यांनी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांशी संपर्क वाढवला आहे. हातकणंगले लोकसभा मतदारसंघात कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यारुपाने

Rehabilitation of 'Swabhimani' in Drying and Winter: Conflicts between Farmers' Leaders | वाळवा-शिराळ्यात ‘स्वाभिमानी’ची पुनर्बांधणी : शेतकरी नेत्यांमधील संघर्ष

वाळवा-शिराळ्यात ‘स्वाभिमानी’ची पुनर्बांधणी : शेतकरी नेत्यांमधील संघर्ष

Next
ठळक मुद्दे सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती संघटनेचे नव्याचे नऊ दिवस

अशोक पाटील ।
इस्लामपूर : राज्यातील शेतकरी चळवळीला पुन्हा धार आणण्यासाठी खासदार राजू शेट्टी यांनी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांशी संपर्क वाढवला आहे. हातकणंगले लोकसभा मतदारसंघात कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यारुपाने गेलेली ताकद पुन्हा मिळविण्यासाठी शेट्टी यांनी वाळवा व शिराळा तालुक्यात संघटनेची पुनर्बांधणी सुरु केली आहे. याउलट घाईघाईने स्थापन केलेल्या रयत क्रांती संघटनेची अवस्था नव्याचे नऊ दिवस या म्हणीप्रमाणे झाली आहे.
हातकणंगले लोकसभा मतदार संघाचा इस्लामपूर-शिराळा मतदार संघ केंद्रबिंदू आहे. गत निवडणुकीत आघाडी काँग्रेसकडून या मतदार संघाची धुरा आमदार जयंत पाटील यांच्यावर होती. आगामी निवडणुकीत राजू शेट्टी हे काँग्रेस आघाडीच्या माध्यमातून निवडणूक रिंगणात उतरणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे जयंत पाटील हे टेन्शन फ्री दिसत आहेत. त्यांनी शेट्टी यांच्या भूमिकेविषयी बोलणे टाळले आहे.
शेट्टी यांनी आपला शत्रू भाजप (सदा) मानूनच आपली वाटचाल सुरु केली आहे. स्वाभिमानीतून बाहेर पडलेल्या कार्यकर्त्यांची पुन्हा जुळवाजुळवही सुरु केली आहे. स्वगृही परतलेल्या सयाजी मोरे यांना शेट्टी यांनी पक्षाचे प्रदेश उपाध्यक्षपद दिले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून हकालपट्टी झाल्यानंतर सदाभाऊ खोत यांनी संघटनेची स्थापना केली.
पहिलीच सभा त्यांनी शेट्टी यांचा बालेकिल्ला असलेल्या हातकणंगले येथे, तर जयसिंगपूरमध्ये भव्य शेतकरी मेळावा घेऊन त्यांच्यासमोर आव्हान निर्माण केले होते. प्रत्येक जिल्ह्यात कार्यकारिणी जाहीर केली. संघटनेचे नव्याचे नऊ दिवस झाले असतानाच खोत यांनी ‘मी भाजपचाच’ असे सांगून आपली खरी ताकद ही भाजप असल्याचेच अप्रत्यक्षपणे स्वत:हून स्पष्ट केले.
 

रयत क्रांती संघटना राजकीय पक्ष नाही. समाजातील विविध घटकांची समस्या सोडविण्याचे काम ही संघटना करते. विधानपरिषदेसाठी सदाभाऊ खोत यांनी अर्ज करताना भाजपचा एबी फॉर्म भरला होता. त्याचा विपर्यास प्रसारमाध्यमांनी केला आहे.
- सागर खोत, युवा ने ते,रयत क्रांती संघटना.

Web Title: Rehabilitation of 'Swabhimani' in Drying and Winter: Conflicts between Farmers' Leaders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.