ऑनलाईन बियाणे मागणीत क्षेत्राची जाचक अट शिथील करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:27 AM2021-05-26T04:27:02+5:302021-05-26T04:27:02+5:30
नरवाड : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन कृषी बियाण्यांच्या मागणी क्षेत्राची अट कायम असल्याने अनेक शेतकरी लाभापासून वंचित आहेत. महाराष्ट्र ...
नरवाड : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन कृषी बियाण्यांच्या मागणी क्षेत्राची अट कायम असल्याने अनेक शेतकरी लाभापासून वंचित आहेत.
महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाकडे शेतकऱ्यांनी बियाणे मागणीसाठी ऑनलाईन अर्ज करावयाचे आहेत. मात्र ते अर्ज करतांना अर्जात कमीतकमी ४० आर जमीन क्षेत्राची अट घालून दिली आहे. तरच संगणक शेतकऱ्यांचे अर्ज भरून घेत आहे.
सध्या कृषी विभागाकडून सोयाबीन, मका, उडीद, भुईमूग, तूर आदी बियाणे ५० टक्के अनुदानावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
४० आर ( एक एकर ) क्षेत्राच्या आतील शेतकरी पात्र असूनही अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येत नाही. हा अन्याय असून किमान २० आर क्षेत्राची अट लागू करण्याची मागणी शेतकऱ्यांतून होत आहे. तरच ही योजना व्यापक स्वरुपात तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत जाऊन पोहोचेल.
ही क्षेत्राची अट रद्द करुन सरसकट बियाणे मिळण्याची मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.