बंडातात्या कराडकर यांची मुक्तता करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:18 AM2021-07-10T04:18:38+5:302021-07-10T04:18:38+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : वारकरी संप्रदायाचे बंडातात्या कराडकर यांची शासनाने तातडीने मुक्तता करावी, अशी मागणी भाजपच्या वतीने करण्यात ...

Release the rebellious Karadkar | बंडातात्या कराडकर यांची मुक्तता करा

बंडातात्या कराडकर यांची मुक्तता करा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : वारकरी संप्रदायाचे बंडातात्या कराडकर यांची शासनाने तातडीने मुक्तता करावी, अशी मागणी भाजपच्या वतीने करण्यात आली. याबाबतचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी बर्डे यांना देण्यात आले.

कमी लोकांसह बंडातात्या कराडकर यांनी पायी वारीचा संकल्प केल्या होता. राज्य सरकारने कराडकर यांना स्थानबद्ध केले आहे. कराडकर यांना स्थानबद्ध करणे उचित नसून त्यांची त्वरित मुक्तता करावी, अशी मागणी भाजप आध्यात्मिक आघाडीच्या वतीने करण्यात आली.

नगरसेविका ॲड. स्वाती शिंदे म्हणाल्या की, पंढरपूर पोटनिवडणुकीत मंत्र्यांच्या उपस्थितीत हजारो लोकांचे मेळावे झालेले चालतात, मंत्र्यांच्या सभांमुळे कोरोनाचा प्रसार होत नाही; पण महाविकास आघाडी सरकारने मोजक्या लोकांच्या उपस्थितीत वारीवर बंदी घातली आहे.

यावेळी अजयकुमार वाले, श्रीकांत शिंदे, बाळासाहेब बेलवलकर, अविनाश मोहिते, मोहन जामदार, गणेश कांबळे उपस्थित होते.

Web Title: Release the rebellious Karadkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.