सांगली शहरात प्रायोगिक तत्त्वावर प्रायोगिक तत्त्वावर सुधारीत वाहतूक नियोजन जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2018 05:39 PM2018-03-21T17:39:50+5:302018-03-21T17:39:50+5:30
महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन 1951 चे कलम 33 पोटकलम (1) (ब) रहदारी अधिकारान्वये पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिका क्षेत्रातील वाहतूक व्यवस्था सुरळीत राहण्यासाठी दिनांक 13 एप्रिल 2018 रोजी पर्यंत सुधारीत वाहतूक नियोजन जाहीरनामा प्रायोगिक तत्त्वावर प्रसिध्द केला आहे.
सांगली : महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन 1951 चे कलम 33 पोटकलम (1) (ब) रहदारी अधिकारान्वये पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिका क्षेत्रातील वाहतूक व्यवस्था सुरळीत राहण्यासाठी दिनांक 13 एप्रिल 2018 रोजी पर्यंत सुधारीत वाहतूक नियोजन जाहीरनामा प्रायोगिक तत्त्वावर प्रसिध्द केला आहे.
या आदेशानुसार वाहतुक सुरळीत होण्याकरीता हरभट रस्त्यावरील भगवानलाल कंदी दुकान (महानगरपालिका चौक ) ते टिळक चौक (करमरकर दवाखाना ते डोंगरे सराफ खेरीज) सम तारखेस व व टिळक चौक ते वासुदेव बळवंत फडके रिक्षा स्टॉप (धोंगडे फोटो स्टुडीओ ते नॉव्हेल प्रॉडक्टर दुकान खेरीज) पर्यंत विषम तारखेस प्रायोगिक तत्वावर सम-विषम फक्त दुचाकी वाहनांना सकाळी 8.00 ते 21.00 वाजेपर्यंत पार्कीग व्यवस्था करण्यात आली आहे.
करमरकर दवाखाना ते डोंगरे सराफ पर्यंत सम तारखेस व धोंगडे फोटो स्टुडिओ ते नॉव्हेल प्रॉडक्टर पर्यंत विषम तारखेस फक्त चारचाकी वाहनांना सकाळी 8.00 ते 21.00 वाजेपर्यंत पार्कीग व्यवस्था करण्यात आली आहे.
वाहन चालकांनी व जनतेने बदल केलेल्या वाहतूक नियोजनास सहकार्य करावे. तसेच आपल्या हरकती, सुचना पोलीस निरीक्षक वाहतुक नियंत्रण शाखा सांगली किंवा पोलीस अधीक्षक कार्यालयास पाठवाव्यात. जेणेकरून प्राप्त झालेल्या सुचनांचे अवलोकन केल्यानंतर वाहतूक नियोजनात योग्य ते बदल करण्यात येतील, असे पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी स्पष्ट केले आहे.