बिळुर परिसरात पावसाने दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 04:18 AM2021-07-11T04:18:51+5:302021-07-11T04:18:51+5:30
------------------- मद्यपी वाहनचालकांवर कारवाईची मागणी सांगली : मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्यांमुळे वारंवार अपघात होत आहे. मद्यप्राशन करून वाहन चालविणे ...
-------------------
मद्यपी वाहनचालकांवर कारवाईची मागणी
सांगली : मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्यांमुळे वारंवार अपघात होत आहे. मद्यप्राशन करून वाहन चालविणे हा गुन्हा असूनही असे प्रकार थांबत नाहीत. यामुळे आता अशा वाहनचालकांवर कडक कारवाईची मागणी नागरिकांतून केली जात आहे.
-------------------
पाणीनिचऱ्याचा प्रश्न गंभीर
मिरज : शहरातील काही भागांमध्ये तसेच खुले भूखंड असणाऱ्या परिसरात पावसाचे पाणी साचून राहत आहे. याचा शेजारील नागरिकांना त्रास होत आहे. यामुळे आरोग्याचीही समस्या निर्माण होण्याची भीती आहे. यामुळे साचलेल्या पाण्याचा निचरा करण्यासाठी विशेष प्रयत्न होणे गरजेचे आहे.
------------
मुलांच्या आरोग्याची काळजी घ्या
सांगली : शाळा बंद व लॉकडाऊनमुळे मुले घरातच आहेत. त्यांच्या शारीरिक व्यायामाला मर्यादा येत आहेत. त्यातच कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत मुलांच्या आरोग्याला धोका असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. यामुळे पालकांनी मुलांच्या आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
---------------------
दूधगाव परिसरात पिकावर औषध फवारणी
दूधगाव : मिरज तालुक्यातील दूधगाव येथे सध्या सोयाबीन पिकांची चांगली वाढ झाली आहे. सोयाबीन पिकाच्या वाढीसाठी पुरेसा पाऊस झाला आहे. सध्या पिकावर किडीचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून शेतकरी औषध फवारणी करण्यात व्यस्त असल्याचे दिसून येत आहे.