पलूस तालुक्यातील महिलांना मायक्रो फायनान्सच्या जाचातून दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:37 AM2021-06-16T04:37:01+5:302021-06-16T04:37:01+5:30
जयंत पाटील यांनी पलूसचे सहायक पोलीस निरीक्षक विकास जाधव यांना फोन करून या महिलांना न्याय मिळवून देण्याचे आदेश दिले ...
जयंत पाटील यांनी पलूसचे सहायक पोलीस निरीक्षक विकास जाधव यांना फोन करून या महिलांना न्याय मिळवून देण्याचे आदेश दिले होते. सक्तीची वसुली करणाऱ्या तालुक्यातील मायक्रो फायनान्स कंपन्यांविरोधात महिला राष्ट्रवादीने दोन वर्षांपासून आमदार अरुण लाड यांच्या नेतृत्वाखाली मोहीम छेडली होती. जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदने दिली होती. वेळप्रसंगी आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला होता. या लढ्याला अखेर यश आले. या मायक्रो फायनान्स कंपन्यांनी नरमाई दाखवत थकीत हफ्ते कोरोना काळात पुढे ढकलण्याचे आणि ज्यादा व्याज न आकारण्याचे मान्य केले आहे.
यावेळी महिला राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षा नंदाताई पाटील म्हणाल्या, मागीलवर्षी पूरस्थिती आणि यावर्षी कोरोनाने संसाराचा कणा मोडला असताना महिला मायक्रो फायनान्सच्या जाळ्यात अडकतात आणि वेळप्रसंगी मुद्दलापेक्षा जास्त व्याज भरूनदेखील कर्ज भागत नाही. यासाठी राष्ट्रवादीने ही मोहीम हातात घेतली होती.