वीजचोरीसाठी थेट मीटरमध्येच रिमोट सेन्सरमीटर, बायपास करून वीज घेण्याचाही प्रकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 04:25 AM2021-09-13T04:25:07+5:302021-09-13T04:25:07+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : वीजचोरीसाठी नाना तऱ्हेच्या क्लृप्त्या ग्राहक लढवत आहेत. त्याला आळा घालण्यासाठी महावितरणने प्रत्येक शनिवारी वीजचोरीविरोधात ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : वीजचोरीसाठी नाना तऱ्हेच्या क्लृप्त्या ग्राहक लढवत आहेत. त्याला आळा घालण्यासाठी महावितरणने प्रत्येक शनिवारी वीजचोरीविरोधात मोहीम सुरू केली आहे. गेल्या महिन्याभरात अनेक ठिकाणी वीजचोऱ्या उघडकीस आणल्या आहेत. वीजचोरी केल्यास थेट तुरुंगात धाडू, असा इशारा महावितरणने दिला आहे.
पुणे विभागात प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांच्या आदेशानुसार आता प्रत्येक शनिवारी ग्राहकांच्या वीज तपासण्यांची मोहीम हाती घेण्यात आली आहे. विशेषत: संशयास्पद वीजबिले असलेल्या ग्राहकांची झाडाझडती घेतली जात आहे. मोहिमेला चांगले यश मिळाले असून वीजचोऱ्या उघडकीस येत आहेत.
बॉक्स
मीटरमध्ये सेन्सर बसविण्याची क्लृप्ती
- वीजचोरीसाठी रिमोट कंट्रोलचा वापर होत आहे. विशेषत: मोठ्या संस्था, उद्योगांमध्ये ही चलाखी केली जाते. मीटरमध्ये सेन्सर बसवून रिमोट कंट्रोलने हवे तेव्हाच मीटर सुरू ठेवले जाते.
- वायर मीटरमधून नेण्याऐवजी बाजूने नेली जाते, त्यामुळे मीटर फिरत नाही. फक्त किमान बिल येते. घरगुती ग्राहक हा प्रकार सर्रास करत असल्याचे आढळले आहे.
बॉक्स
फौजदारी गुन्हा, दंड आणि कारावासदेखील
वीजचोरी पहिल्यांदा सापडल्यास शक्यतो तडजोडीचा प्रयत्न केला जातो. वीजचोरीची रक्कम आणि दंडाची कारवाई केली जाते. पण पुन्हा चोरी सापडल्यास फौजदारी गुन्हा दाखल केला जातो.
वीज अधिनियम २००३ नुसार तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.
बॉक्स
माधवनगरमध्ये साडेचार कोटींची वीजचोरी
माधवनगरमध्ये नुकतीच तब्बल साडेचार कोटींची वीजचोरी उघडकीस आली. गेल्या चार ते पाच वर्षांपासून एका व्यावसायिक आस्थापनेमध्ये विजेची चोरी सुरू होती. त्यासाठी मीटरमध्ये फेरफार करण्यात आला होता. तेथील विजेचा मोठा वापर आणि त्या तुलनेत अत्यल्प वीजबिल याची छाननी वीज अधिकाऱ्यांनी केली, तेव्हा चोरीचा प्रकार उघडकीस आला. ऐन शहरात वर्षानुवर्षे बिनबोभाट वीजचोरी सुरू होती, तरीही ती वेळीच उघडकीस येऊ शकली नाही.
कोट
महावितरणकडून शेती वगळता अन्य विजेच्या ?????तातडीने दिल्या जातात, त्यामुळे ग्राहकांनी विजेची चोरी टाळावी. चोरी सापडल्यास कडक कायदेशीर कारवाई केली जात आहे.
- विनायक इदाते, कार्यकारी अभियंता, महावितरण