रेणुशेवाडी सरपंचपदासाठी उमेदवारच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2017 01:47 PM2017-10-01T13:47:01+5:302017-10-01T13:47:05+5:30

रेणुशेवाडी (ता. कडेगाव) येथे सरपंचपदाचे आरक्षण इतर मागास प्रवर्ग (ओबीसी)असे आहे. परंतु येथे या प्रवर्गातील उमेदवारच नाही, त्यामुळे सरपंचपद रिक्तच राहणार आहे. याशिवाय एकूण ७ जागांपैकी सदस्यपदाच्या २ आरक्षित जागाही रिक्त राहणार आहेत.

Renukeshwadi is not the candidate for the post of Sarpanch | रेणुशेवाडी सरपंचपदासाठी उमेदवारच नाही

रेणुशेवाडी सरपंचपदासाठी उमेदवारच नाही

Next

कडेगाव : रेणुशेवाडी (ता. कडेगाव) येथे सरपंचपदाचे आरक्षण इतर मागास प्रवर्ग (ओबीसी)असे आहे. परंतु येथे या प्रवर्गातील उमेदवारच नाही, त्यामुळे सरपंचपद रिक्तच राहणार आहे. याशिवाय एकूण ७ जागांपैकी सदस्यपदाच्या २ आरक्षित जागाही रिक्त राहणार आहेत.

ग्रामस्थांनी एकसंधपणे ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोघ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सर्वसाधारण महिला व सर्वसाधारण असलेल्या ५ जागांसाठी ५ अर्ज दाखल झाले आहेत. हे उमेदवार बिनविरोध सदस्य होण्याची शक्यता आहे.


रेणुशेवाडी येथे बहुतांशी सर्वसाधारण खुल्या प्रवर्गातील नागरिक आहेत. येथे आरक्षित प्रवर्गातील उमेदवार मिळत नाहीत. येथे बिनविरोध निवडणुकीची परंपरा आहे. ही परंपरा अखंडित ठेवण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे.

आजअखेर वनिता संजय रेणुशे, कमल सत्यवान रेणुशे,अर्चना अण्णासाहेब रेणुशे, अनिल रघुनाथ रेणुशे, शंकर बाजीराव रेणुशे या ५ उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. हे उमेदवार बिनविरोध सदस्य होण्याची शक्यता आहे.

उपसरपंच पाहणार कारभार

रेणुशेवाडी ग्रामपंचायत निवडणुकीत थेट सरपंचपदासाठी आरक्षित ओबीसी प्रवर्गातील उमेदवार नसल्यामुळे येथे सरपंचपदाचा कारभार पाहण्याची संधी मिळणार आहे.

Web Title: Renukeshwadi is not the candidate for the post of Sarpanch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.