नांदणी नदीवरील पूल दुरुस्त करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:24 AM2021-08-01T04:24:40+5:302021-08-01T04:24:40+5:30
फोटो ओळ : कडेगाव तहसील विभागातील अधिकारी एम. एस. जगताप यांना प्रकाश गडळे, अधिक पिंगळे, भुजंग माळी, अवधूत माळी ...
फोटो ओळ : कडेगाव तहसील विभागातील अधिकारी एम. एस. जगताप यांना प्रकाश गडळे, अधिक पिंगळे, भुजंग माळी, अवधूत माळी यांनी निवेदन दिले.
कडेगाव : अमरापूर (ता. कडेगाव) येथील नांदणी नदीवरील पूल दुरुस्त करून वाहतुकीस सुरू करावा, अशी मागणी भाजप ओबीसी मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस प्रकाश गढळे यांनी केली आहे. तहसील विभागीय अधिकारी एम. एस. जगताप यांना निवेदन दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, सध्या गुहागर-विजापूर महामार्गावरील कडेगाव तालुक्यातील अमरापूर येथील नांदणी नदीवरील पूल महापुरामुळे वाहून गेल्याने आसपासच्या परिसराचा संपर्क तुटला आहे. वाहतुकीची अडचण झाली आहे. पर्यायी मार्ग म्हणून चिखली-खेराडे, वांगी-विटा या मार्गाने ये-जा करावी लागत आहे. तरी लवकरात लवकर पुलाची दुरुस्ती करून वाहतुकीस मार्ग खुला करावा, अन्यथा आमच्याकडे आंदोलनाशिवाय पर्याय उरणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
निवेदनावर अधिक पिंगळे, भुजंग माळी, अवधूत माळी, संग्राम पडळकर, सर्जेराव रूपनर, भानुदास काकडे, धनाजी पाटील, राहुल वाघमोडे, राहुल होनमाने, प्रकाश रास्कर, संतोष माने, बळवंत मोरे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.