संजयनगरमधील स्वच्छतागृहाच्या दुरुस्तीचे काम सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 04:21 AM2021-01-14T04:21:55+5:302021-01-14T04:21:55+5:30
संजयनगर : सांगली शहरातील प्रभाग क्रमांक ११ संजयनगर डॉ. लिमये रोड येथे महापालिका स्वच्छतागृहाची दुरवस्था झाली होती. त्यातून ...
संजयनगर : सांगली शहरातील प्रभाग क्रमांक ११ संजयनगर डॉ. लिमये रोड येथे महापालिका स्वच्छतागृहाची दुरवस्था झाली होती. त्यातून मैला थेट गटारीत येत होता व परिसरात दुर्गंधी पसरली होती. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात, असे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर महापालिकेच्या प्रशासनाला जाग आली. संक्रांतीच्या मुहूर्तावर स्वच्छतागृहाचे काम गतीने सुरू झाले आहे. यामुळे नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.
संजयनगर प्रभाग क्रमांक ११ डॉ. लिमये रोड याठिकाणी महानगरपालिकेचे चार युनिटचे स्वच्छतागृह आहे. यामधील मैला थेट गटारीत जात असून परिसरात दुर्गंधी पसरली आहे. महापालिकेचे आयुक्त नितीन कापडणीस यांनी त्वरित काम करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यामुळे याठिकाणी सहायक आयुक्त सहदेव कावडे. आरोग्य अधिकारी डॉ. रवींद्र ताटे, स्वच्छता निरीक्षक गणेश माळी, मुकादम अमोल घुणके, शाखा अभियंता ऋतुराज यादव, ठेकेदार रवींद्र ढगे यांनी या कामाची पाहणी केली.
फोटो-१३दुपटे४
फोटो ओळी :
संजयनगर येथील महापालिकेच्या स्वच्छतागृहाचे काम सुरू करण्यात आले आहे. छाया - सुरेंद्र दुपटे