सुधारित नागरिकत्व कायदा रद्द करा, तासगाव येथे सर्वपक्षीय मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2020 06:06 PM2020-01-18T18:06:41+5:302020-01-18T18:08:06+5:30
सुधारित नागरिकत्व कायदा रद्द करा, अशी मागणी करीत तासगाव येथे शुक्रवारी नागरिकत्व दुरुस्ती कायदा, तसेच राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी कायद्याच्या विरोधात सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला. तहसील कार्यालयावर निघालेल्या मोर्चास नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थिती दाखवून पाठिंबा व्यक्त केला.
तासगाव : सुधारित नागरिकत्व कायदा रद्द करा, अशी मागणी करीत तासगाव येथे शुक्रवारी नागरिकत्व दुरुस्ती कायदा, तसेच राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी कायद्याच्या विरोधात सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला. तहसील कार्यालयावर निघालेल्या मोर्चास नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थिती दाखवून पाठिंबा व्यक्त केला.
डॉ. बाबूराव गुरव, फारूक गवंडी, तासगाव तालुका सुधार समितीचे अध्यक्ष संदेश भंडारे, माजी नगराध्यक्ष अमोल शिंदे, जाफर मुजावर, अर्जुन थोरात यांनी मोर्चाचे नेतृत्व केले. मोर्चात आमदार सुमनताई पाटील, काँग्रेसचे विशाल पाटील, श्रीमंत कोकाटे आदी सहभागी झाले होते.
विटानाका चौक येथून मोर्चा सुरू झाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौकातून बुरुड गल्लीमार्गे, सिद्धेश्वर चौक, पोस्ट कार्यालयापासून सांगली नाक्यावरून मोर्चा तहसील कार्यालयावर आला.
यावेळी फारूक गवंडी, हाफिज सलमान साहब, बहुजन नेते भीमराव भंडारे, रवी साळुंखे, माजी नगराध्यक्ष अमोल शिंदे, डी. के. पाटील, संदेश भंडारे, अर्जुन थोरात, नाना वाघमारे यांचीही भाषणे झाली.
काँग्रेसचे विशाल चंदुरकर, शिवसेनेचे अमोल काळे, अरुण खरमाटे, शेकापचे बाबूराव जाधव, पांडुरंग जाधव, एआयएमआयचे सलाउद्दीन मुरसल, सलीम शेख, सिद्धिक मुल्ला, इरफान सलाते, स्वाभिमानी संघटनेचे जोतिराम जाधव, संभाजी ब्रिगेडचे अमोल कदम, विशाल रेणुसे, बसपाचे शंकर माने, मुन्ना कोकणे, राष्ट्रवादीचे डी. के. पाटील, शरद शेळके, वंचित आघाडीचे शेखर पावसे, मातंग समाज संघटनेचे विनोद देवकुळे, संजीव देवकुळे, होलार समाजाचे प्रकाश कांबळे, भटक्या विमुक्तांचे संदीप चव्हाण, विजय जाधव, रवी चव्हाण व कार्यकर्त्यांनी नियोजन केले.
विविध संघटनांनी आंदोलनास पाठिंबा दिला. विद्यार्थी, शेतकरी, शेतमजूर, व्यापारी, महिला, ज्येष्ठ नागरिकांची उपस्थिती लक्षणीय होती. सूत्रसंचालन ह्यसीपीएमह्णचे राजेंद्र वाटकर यांनी केले. डॉ. विवेक गुरव यांनी आभार मानले.