वाटेगावात पुरस्थिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 04:17 AM2021-07-24T04:17:38+5:302021-07-24T04:17:38+5:30
वाटेगाव : वाटेगाव (ता. वाळवा) परिसर व शिराळा उत्तर भागात शुक्रवारी दुसऱ्या दिवशी मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत ...
वाटेगाव : वाटेगाव (ता. वाळवा) परिसर व शिराळा उत्तर भागात शुक्रवारी दुसऱ्या दिवशी मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. अनेक घरांना पाण्याचा वेढा पडला.
वाटेगाव येथील बापूचा तलाव, शिराळा उत्तर भागातील गिरवजडे धरण, टाकवे धरण, पाचुंब्री तलाव भरल्याने वाटेगाव येथील मुख्य ओढ्याला गुरूवारी सायंकाळी पूर आला. शुक्रवारी दुपारी १२ वाजल्यानंतर ओढा काठच्या भुयाचा घोळ, धनगर गल्ली, थोरात गल्ली, चव्हाण मळी येथील घरांमध्ये, जनावरांच्या गोठ्यात पाणी शिरले. पात्राच्या बाहेर पाणी आल्याने ओढा काठावरील लोक भयभीत झाले आहेत. नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याचे काम दिवसभर सुरु हाेते. दरम्यान वाटेगाव मुख्य ओढ्यावरील पूल पाण्याखाली गेल्याने वाटेगाव वाडी व शिराळा उत्तर भागातील बांबवडे, पाचुंब्री, टाकवे गिरवजडे धरण परिसरातील १० ते १२ गावांचा संपर्क तुटला आहे.
फोटो : २३ वाटेगाव १..२..३
१) वाटेगाव येथे ओढ्याला आलेला पूर
२) वाटेगाव येथे घरांना पाण्याचा वेढा
३) वाटेगाव येथे शाळा व ग्रामदैवत वाटेश्वर मंदिराला पाण्याचा वेढा.