ब्राह्मण समाजाच्या आरक्षणाचा अहवाल देणार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2018 04:27 AM2018-12-03T04:27:20+5:302018-12-03T04:27:31+5:30

मराठा समाजापाठोपाठ आता जो समाज आरक्षणाची मागणी करेल, अशा प्रत्येक समाजाबद्दलचा अहवाल आम्ही मागासवर्गीय आयोगाकडे सादर करणार आहोत.

Report to the Brahmin community | ब्राह्मण समाजाच्या आरक्षणाचा अहवाल देणार

ब्राह्मण समाजाच्या आरक्षणाचा अहवाल देणार

Next

सांगली : मराठा समाजापाठोपाठ आता जो समाज आरक्षणाची मागणी करेल, अशा प्रत्येक समाजाबद्दलचा अहवाल आम्ही मागासवर्गीय आयोगाकडे सादर करणार आहोत. ब्राह्मण समाजाबद्दलचा अहवालही आम्ही पाठविणार आहोत, अशी माहिती महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी रात्री सांगलीत दिली.
मराठा आरक्षणाचा मार्ग मोकळा झाल्यानंतर आता ब्राह्मण समाजालाही आरक्षण देण्यात यावे, अशी मागणी ब्राह्मण महासंघाचे आनंद दवे यांनी केली आहे. ग्रामीण भागात राहणारा ब्राह्मण समाज हा आर्थिकदृष्ट्या मागासलेला आहे. त्यामुळे राज्य मागासवर्ग आयोगाने ब्राह्मण समाजाच्या आरक्षणाचा विचार करावा. त्यासाठी या समाजाच्या आर्थिक आणि सामाजिक स्थितीचे सर्वेक्षण करावे. यामध्ये ब्राह्मण समाजाचे मागासपण सिद्ध झाल्यास त्यांनाही आरक्षण देण्यात यावे, अशी मागणी दवे यांनी केली आहे.
पाटील म्हणाले की, निवडणूक तोंडावर आली, म्हणून आम्ही मराठा आरक्षणाचा निर्णय घेतलेला नाही. कायद्याच्या पातळीवर सक्षम असलेले व टिकणारे आरक्षण दिले आहे. निवडणुकीला अजून वर्षभराचा कालावधी आहे. सर्व समाजघटकांना कायद्याच्या पातळीवर समान न्याय देण्याचा आमचा प्रयत्न आहे.

Web Title: Report to the Brahmin community

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.