दिलासादायक : सांगली जिल्हा कोरोनामुक्तीकडे! खेराडे वांगी च्या ३० जणांचे अहवाल निगेटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2020 10:59 AM2020-04-24T10:59:11+5:302020-04-24T11:04:57+5:30
यामुळे खेराडे वांगी येथील ३० जणांना विलगीकरण कक्षात ठेवून त्यांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते हे सर्व नमुने निगेटिव आले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी दिली.
सांगली : कडेगाव तालुक्यातील खेराडे वांगी मध्ये शनिवारी एकावर अंत्यसंस्कार करण्यात आल्यानंतर ती व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे समजले होते. यामुळे खेराडे वांगी येथील ३० जणांना विलगीकरण कक्षात ठेवून त्यांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते हे सर्व नमुने निगेटिव आले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी दिली.
मुंबई येथे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे खेराडे वांगी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले होते. ही व्यक्ती कोरोणा पॉझिटिव्ह असल्याचे कळाल्यानंतर प्रशासनाने अंत्यसंस्काराला उपस्थित असलेले व अन्यसंबंधित ३० व्यक्तींना कडेगाव येथे इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन मध्ये ठेवले होते. व या व्यक्तींची नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. शुक्रवारी सकाळी या सर्वांची चाचणी निगेटिव्ह आल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. चौधरी यांनी सांगितले.