‘मरळनाथपूर’प्रकरणी पाच अधिकाऱ्यांवर ठपका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2018 05:44 AM2018-09-16T05:44:07+5:302018-09-16T05:44:23+5:30

अहवाल कृषी आयुक्तांकडे; शेती अभियान योजनेत भ्रष्टाचार

Representation of five officers in 'Maralanathpur' | ‘मरळनाथपूर’प्रकरणी पाच अधिकाऱ्यांवर ठपका

‘मरळनाथपूर’प्रकरणी पाच अधिकाऱ्यांवर ठपका

Next

सांगली : मरळनाथपूर (ता. वाळवा) येथे कोरडवाहू शेती अभियान योजनेतील भ्रष्टाचारप्रकरणी पाच अधिकाºयांवर ठपका ठेवण्यात आला आहे. शनिवारी झालेल्या जिल्हा भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या बैठकीत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाºयांनी याबाबत माहिती दिली. चौकशीत दोषी आढळलेल्या अधिकाºयांवर कारवाईसाठी अहवाल कृषी आयुक्तांकडे पाठविण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.
कोरडवाहू शेती अभियान योजनेतून कृषी साहित्य अनुदानात अनियमितता झाल्याची तक्रार संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सुयोग औंधकर व बळीराजा संघटनेचे बी. जी. पाटील यांनी पुराव्यासह केली होती. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हाधिकारी विजय काळम-पाटील यांनी चौकशीचे आदेश दिले होते. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र साबळे यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनी या प्रकरणाची चौकशी करून अहवाल जिल्हाधिकाºयांकडे सादर केला होता. अहवाल सादर करूनही बराच कालावधी उलटल्याने नेमकी काय कारवाई होणार अथवा या अहवालात नक्की काय आहे, याबाबत चर्चा सुरू होती. या अहवालानुसार ठपका ठेवण्यात आलेल्या अधिकाºयांवर कारवाईचे अधिकार भ्रष्टाचार निर्मूलन समितीला नसल्याने अहवाल कृषी आयुक्तांना सादर करण्याचा निर्णय घेण्यात आला.

प्रकरण राज्यभर चर्चेत
मरळनाथपूर हे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचे गाव आहे. त्यांच्या गावातच हे भ्रष्टाचाराचे प्रकरण घडल्याने याची राज्यभर चर्चा झाली होती. विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी या प्रकरणावर आवाज उठविला होता. त्यानंतर खोत यांनीही आक्रमक होत लाभार्थ्यांना नियमानुसारच लाभ मिळाल्याची माहिती सभागृहात दिली होती.

Web Title: Representation of five officers in 'Maralanathpur'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.