तासगावात पाईपमध्ये अडकलेल्या गाढवाला जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:30 AM2021-09-23T04:30:37+5:302021-09-23T04:30:37+5:30

शहरातील कांचन पेट्रोल पंपाजवळ तीन फूट उंचीची सिमेंट पाईपची गटर आहे. दोन दिवसांपूर्वी या पाईपमध्ये एक गाढव अडकले. बाहेर ...

Rescue a donkey stuck in a pipe in Tasgaon | तासगावात पाईपमध्ये अडकलेल्या गाढवाला जीवदान

तासगावात पाईपमध्ये अडकलेल्या गाढवाला जीवदान

Next

शहरातील कांचन पेट्रोल पंपाजवळ तीन फूट उंचीची सिमेंट पाईपची गटर आहे. दोन दिवसांपूर्वी या पाईपमध्ये एक गाढव अडकले. बाहेर पडण्यासाठी हालचाल करण्याच्या नादात ते पाईपमध्ये शंभर फूट आत गेले. नगरपालिकेचे अधिकारी प्रताप घाडगे यांना पाईपमध्ये गाढव अडकल्याचे समजले. मात्र गाढव पाईपच्या आत गेल्याने त्याला घाणीत आत जाऊन काढायचे कसे? हा प्रश्न होता.

अखेर बंद पाईपमधील गाढवाची जागा शोधून सागर जावळे या तरुणाला पाईपमध्ये पाठवले. त्याने आत जाऊन गाढवाचे पाय दोरीने बांधले. दोरीच्या साहाय्याने त्याला ओढत बाहेर काढले. तीन दिवस खायला न मिळाल्याने ते अशक्त झाले होते. पालिकेचे अधिकारी व तरुणांचे कौतुक होत आहे. या मदतकार्यात सागर जावळे, वैभव गेजगे, दादा जाधव यांनी सहभाग घेतला.

Web Title: Rescue a donkey stuck in a pipe in Tasgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.