आरक्षणप्रश्नी समाजात अस्वस्थता
By admin | Published: October 20, 2016 12:15 AM2016-10-20T00:15:09+5:302016-10-20T00:15:09+5:30
जयंत पाटील : आष्ट्यात ‘सोमाजी कृष्णाजी ढोले प्रवेशद्वारा’चे उद्घाटन
आष्टा : धनगर समाज, मुस्लिम ओबीसी आरक्षण, मराठा मोर्चा याबाबत सगळीकडे अस्वस्थता आहे. मागण्या मान्य करणारे सरकार केंद्र व राज्यात नाही. धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत राज्य शासनाने टाटा कन्सल्टन्सीला माहिती गोळा करण्यासाठी दोन वर्षाची मुदत दिली आहे. आमचे प्रश्न भगवानगडावर न जाता मंत्रिमंडळ बैठकीत सोडवावेत, असे प्रतिपादन माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांनी केले.
येथील माजी उपनगराध्यक्ष सोमाजी कृष्णाजी ढोले प्रवेशद्वाराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. माजी आमदार विलासराव शिंदे अध्यक्षस्थानी होते. नगराध्यक्षा मंगलादेवी शिंदे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिलीप पाटील, दिलीप वग्याणी, विराज शिंदे, माणिक शेळके, संग्राम फडतरे, शिवाजीराव ढोले, जानकास ढोले, पांडुरंग ढोले, लक्ष्मण ढोले, रघुनाथ जाधव, अमित ढोले, विजय मोरे उपस्थित होते. पाटील यांनी माजी उपनगराध्यक्ष ढोले यांनी धनगर समाजाच्या विकासासाठी प्रयत्न केले असल्याचे सांगितले. विलासराव शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले. धनाजी ढोले यांनी स्वागत केले. यावेळी मोहनराव गायकवाड, अर्जुन माने, बाबासाहेब सिद्ध, प्रवीण माने, रामचंद्र सिद्ध, प्रकाश मिरजकर, जगन्नाथ मस्के, समीर गायकवाड, नियाजुलहक नायकवडी, के. ए. माने, दीपक मेथे, अमोल घबक, भगवान बोते, शैलेश सावंत, दत्तराज ओतारी, चंद्रकांत पाटील, वसुंधरा जाधव, सुवर्णा शेंडगे, मनीषा ढोले, प्रकाश रुकडे उपस्थित होते. संदीप तांबवेकर यांनी सूत्रसंचालन केले, तर अमित ढोले यांनी आभार मानले.(वार्ताहर)