ओबीसी समाजासाठीचे आरक्षण रद्द करू नये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:20 AM2021-06-06T04:20:50+5:302021-06-06T04:20:50+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कडेपूर : ओबीसी समाजासाठी असलेले आरक्षण रद्द न करता ते परत द्यावे, अन्यथा आंदोलनाशिवाय पर्याय उरणार ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कडेपूर : ओबीसी समाजासाठी असलेले आरक्षण रद्द न करता ते परत द्यावे, अन्यथा आंदोलनाशिवाय पर्याय उरणार नाही. आरक्षण परत मिळत नाही, तोपर्यंत शांत बसणार नाही, अशा मागणीचे निवेदन भाजप ओबीसी मोर्चाचे प्रदेश चिटणीस प्रकाश गढळे यांनी प्रांताधिकारी गणेश मरकड यांना दिले.
निवेदनात म्हटले आहे, पंधरा महिने झाले तरी राज्य मागासवर्गीय आयोगाचे गठन केलेले नाही. याचा फटका ओबीसी समाजाला बसला आहे.
धनगरांना अनुसूचित जमातीचा दाखला देणार व आदिवासी कल्याणच्या २२ योजना धनगरांसाठी लागू करणार, असा शासन निर्णय झाला होता. परंतु आज अखेर त्याची अंमलबजावणी झालेली नाही.
यावेळी ओबीसी मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष आकाराम पाटील, भाजप तालुकाध्यक्ष धनंजय देशमुख, धनाजी पाटील, कडेगाव तालुका धनगर समाज सरचिटणीस अधिक पिंगळे, राहुल वाघमोडे, भुजंग माळी, गणेश रास्कर, सर्जेराव रूपनर उपस्थित होते.