अग्रण धुळगाव हुमणीमुक्त करण्याचा संकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:28 AM2021-04-20T04:28:47+5:302021-04-20T04:28:47+5:30

ओळ : अग्रण धुळगाव (ता. कवठेमहांकाळ) येथे शेतकऱ्यांनी हुमणी मुक्त गाव करण्याचा संकल्प केला. शिरढोण : कृषी विभागाच्या सहकार्याने ...

Resolution to liberate the leading Dhulgaon | अग्रण धुळगाव हुमणीमुक्त करण्याचा संकल्प

अग्रण धुळगाव हुमणीमुक्त करण्याचा संकल्प

Next

ओळ : अग्रण धुळगाव (ता. कवठेमहांकाळ) येथे शेतकऱ्यांनी हुमणी मुक्त गाव करण्याचा संकल्प केला.

शिरढोण : कृषी विभागाच्या सहकार्याने अग्रण धुळगाव (ता. कवठेमहांकाळ) येथे शेतकऱ्यांनी हुमणीमुक्त गाव करण्याचा संकल्प केला.

अग्रणधुळगाव येथे कृषी विभागातर्फे हुमणी नियंत्रण मार्गदर्शन वर्ग घेण्यात आला.

यावेळी कृषी सहायक जी. ए. अजेटराव म्हणाले हुमणी हे शेतकऱ्यांसमोरील संकट आहे. त्यासाठी एकात्मिक कीड नियंत्रण करणे गरजेचे आहे. सकाळी लवकर नांगरट करणे, शेणखत वापरत असताना त्यामध्ये मेटाराइजियमचा वापर करणे, एरंडी अंबावन सापळे वापरणे, प्रकाश सापळे वापरणे, शेताच्या बांधावरील कडूनिंब, बाभळ अशा झाडावर कीटकनाशक फवारणी करणे. या पाच सूत्रांचा वापर करून हुमणी भुंग्याचे नियंत्रण करू शकतो. यावेळी हुमनी किडीचा जीवनक्रम, हुमणी भुंग्याचे नियंत्रण आणि हुमणी झाल्यानंतर करावयाच्या उपाययोजनांची प्रात्यक्षिकासह चर्चा करण्यात आली.

यावेळी शिवदास भोसले, हेमंत खंडागळे, रमेश खंडागळे, ज्ञानेश्वर भोसले, विनायक जगताप शेतकरी उपस्थित होते.

Web Title: Resolution to liberate the leading Dhulgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.