ढगेवाडीच्या सरपंचांवर विश्वास ठराव मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 04:23 AM2020-12-23T04:23:04+5:302020-12-23T04:23:04+5:30

गौरी कचरे यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव दाखल होऊन त्यांच्यावर मासिक सभेत सहा विरुद्ध दोन मतांनी अविश्वास ठराव पास झाला, तर ...

Resolution passed on Dhagewadi sarpanch | ढगेवाडीच्या सरपंचांवर विश्वास ठराव मंजूर

ढगेवाडीच्या सरपंचांवर विश्वास ठराव मंजूर

Next

गौरी कचरे यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव दाखल होऊन त्यांच्यावर मासिक सभेत सहा विरुद्ध दोन मतांनी अविश्वास ठराव पास झाला, तर ग्रामसभेत त्यांच्यावर ३८ मताने अविश्वास ठराव मंजूर झाला. त्यामुळे त्यांना पदावरून पायउतार व्हावे लागले.

अविश्वास ठराव दाखल होताना मनमानी कारभार, सदस्यांना विश्वासात न घेणे, अशी कारणे देऊन त्यांच्यावर अविश्वास ठराव पास करण्यात आला; मात्र वास्तविक सरपंच गौरी कचरे यांच्या कारभारापेक्षा त्यांनी गावचे पोलीस-पाटील यांना तक्रार झालेल्या प्रकरणात पाठीशी घातल्यामुळे पोलीस-पाटील यांच्या विरोधकांनी गौरी कचरे यांनाच पदावरून दूर केले. तसेच त्यांचे पती यांचा कारभारात होणारा हस्तक्षेप व ज्येष्ठ पॅनलप्रमुख यांना डावलण्याचा व विश्वासात न घेण्याचा प्रकार त्यामुळेच त्यांना पदावरून पायउतार व्हावे लागले, याची चर्चा सुरू आहे.

चौकट

पोलीस-पाटील निलंबित

अविश्वास ठरावासाठी तत्कालीन कारण म्हणजे पोलीस-पाटील. या पोलीस-पाटलांनाही त्यांच्या विविध गैरवर्तणुकीबाबत प्रांताधिकारी नागेश पाटील यांनी नुकतेच निलंबित केले आहे.

Web Title: Resolution passed on Dhagewadi sarpanch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.