चैत्राली पाटील हिचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 04:24 AM2021-01-22T04:24:33+5:302021-01-22T04:24:33+5:30
कामेरी : कामेरी (ता. वाळवा) येथील चैत्राली प्रतापराव पाटील हिने स्केटिंग या क्रीडा प्रकारामध्ये राष्ट्रीय पातळीवर केलेल्या अतुलनीय ...
कामेरी : कामेरी (ता. वाळवा) येथील चैत्राली प्रतापराव पाटील हिने स्केटिंग या क्रीडा प्रकारामध्ये राष्ट्रीय पातळीवर केलेल्या अतुलनीय कामगिरीबद्दल तिला मेजर ध्यानचंद केंद्रीय क्रीडा परिषदेच्यावतीने ‘सुवर्णलक्ष राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार २०२०’ ने सन्मानित करण्यात आले. तिच्या या यशाबद्दल प्रा. अधिक जाधव यांच्याहस्ते तिचा सत्कार करण्यात आला. यावेळी शिरीष वजरीनकर सुनील हवालदार, संजय माने व उमेश पाटील, जगदीश जाधव, विकास पाटील, माणिक माने उपस्थित होते.
राजारामबापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, राजारामनगर या महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत असलेली चैत्राली पाटील ही आर.आय.टी.मध्ये एस. वाय. इलेक्ट्रिकल या वर्गात शिकत असून तिने २०१८-१९ मध्ये स्केटिंग या क्रीडा प्रकारात गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदविले आहे. स्केटिंगबरोबरच सध्या ती रायफल शूटिंग या क्रीडा प्रकारामध्ये विद्यापीठ स्तरावर सहभागी होत आहे. पाटील हिने शालेय स्तरावर रायफल शूटिंग या क्रीडा प्रकारामध्ये देखील राज्य स्तरावरील स्पर्धेमध्ये सहभागी होऊन विशेष कामगिरी केली आहे. तसेच तिने एन. सी. सी.मध्ये ‘सी’ सर्टिफिकेट प्राप्त केले आहे.
तिला मिळालेल्या यशामध्ये तिचे प्रशिक्षक सागर साळुंखे व माया साळुंखे, वडील प्रा. प्रतापराव पाटील, आई प्रभावती पाटील, तसेच महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक डॉ. संदीप पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.
फोटो - २१०१२०२१-कामेरी चैत्राली सत्कार न्यूज
कामेरी (ता. वाळवा) येथे चैत्राली पाटीलला मेजर ध्यानचंद ‘सुवर्णलक्ष’ राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार मिळाल्याबद्दल प्रा. अधिक जाधव यांच्याहस्ते तिचा सत्कार करण्यात आला. यावेळी शिरीष वजरीनकर, सुनील हवालदार, संजय माने व उमेश पाटील, जगदीश जाधव, विकास पाटील, माणिक माने उपस्थित होते.