मराठी भाषेचा सन्मान करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:29 AM2021-03-01T04:29:37+5:302021-03-01T04:29:37+5:30
तासगाव : मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, मराठी ही ज्ञानभाषा व्हावी म्हणून मराठीचा सन्मान करा, असे प्रतिपादन प्राचार्य ...
तासगाव : मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, मराठी ही ज्ञानभाषा व्हावी म्हणून मराठीचा सन्मान करा, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. मिलिंद हुजरे यांनी केले.
तासगाव येथील पद्मभूषण डॉ. वसंतरावदादा पाटील महाविद्यालयात पदवी व पदव्युत्तर मराठी विभाग आणि यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अभ्यास केंद्राच्यावतीने आयोजित मराठी भाषा गौरव दिनाच्या कार्यक्रमात ते बाेलत हाेते.
हुजरे म्हणाले, ज्ञानपीठ विजेते ज्येष्ठ साहित्यिक वि. वा. शिरवाडकर यांचा जन्मदिवस आपण मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा करतो. कुसुमाग्रज यांनी विपुल साहित्य लेखन केले. आपण वाचन संस्कृती वाढवली पाहिजे. मराठी एकमेव भाषा आहे, जी ‘अ’ अज्ञानाने सुरू होते आणि ‘ज्ञ’ ज्ञानी करून सोडते.
यावेळी मराठी विभाग प्रमुख डॉ. शहाजी पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक केंद्र संयोजक प्रा. अण्णासाहेब बागल यांनी केले. कार्यक्रम कमिटी प्रमुख प्रा. आर. बी. मानकर यांनी आभार मानले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. तातोबा बदामे यांनी केले. कार्यक्रमाला डॉ. हाजी नदाफ, अधीक्षक एम. बी. कदम, महेश चव्हाण, विजय लोहार, जगदीश सावंत, याचबरोबर महाविद्यालयातील प्राध्यापक, प्रशासकीय सेवक व विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.