राष्ट्रवादी अल्पसंख्याक सेलच्या रक्तदान शिबिरास प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:23 AM2021-04-14T04:23:34+5:302021-04-14T04:23:34+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : कोरोनाची दुसरी लाट चिंताजनक बनत चालली आहे. त्यात रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेस ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : कोरोनाची दुसरी लाट चिंताजनक बनत चालली आहे. त्यात रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक सेलच्या वतीने मिरजेत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात दोनशेहून अधिक जणांनी रक्तदान करीत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात रक्तसंकलन करण्याचे आवाहन अध्यक्ष शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक सेलच्या वतीने मिरजेतील मनेर कॉम्प्लेक्स येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कोरोना नियमांचे पालन करीत हे शिबिर पार पडले. यात २०० रक्तदात्यांनी उत्स्फूर्त भाग घेऊन रक्तदान केले. शिबिराचे आयोजन अल्पसंख्याक सेलचे सांगली शहराध्यक्ष आयुब बारगीर, अश्रफ शेख, मेहबूब मनेर, नगरसेविका नर्गिस सय्यद, वाजीद खतीब यांच्या पुढाकाराने करण्यात आले. इरशाद पखाली, मुन्ना शेख, सद्दाम कुरणे, अकबर शेख, सरफराज शेख, सद्दाम मुजावर, अशरफ चाऊस, जुनेद जमादार, अझहर सय्यद, रौनक आलसकर यांनी संयोजन केले.
यावेळी उपस्थित माजी महापौर मैनुद्दीन बागवान, राहुल पवार, अभिजित हारगे, वंदना चंदनशिवे, राधिका हारगे, विजय माळी, अतहर नायकवडी, आझम काजी, डॉ. शुभम जाधव, शुभम ठोंबरे, सुहेल सतारमेकर, जयबाल शेख, दिग्विजय माळी या प्रमुख अतिथींनी या शिबिरास भेट दिली.