व्यवसाय परवाना शिबिरास केमिस्ट व्यावसायिकांचा प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:24 AM2021-03-06T04:24:42+5:302021-03-06T04:24:42+5:30
फोटो ओळी :- महापालिकेच्या व्यवसाय परवाना शिबिरात नूतन महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अध्यक्ष विजयकुमार पाटील, ...
फोटो ओळी :-
महापालिकेच्या व्यवसाय परवाना शिबिरात नूतन महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अध्यक्ष विजयकुमार पाटील, अविनाश पोरे उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : महापालिकेच्या व्यवसाय परवाना शिबिरास केमिस्ट व्यावसायिकांनी मोठा प्रतिसाद दिला आहे. आतापर्यंत २५० हून अधिक केमिस्ट व्यावसायिकांनी परवान्यासाठी महापालिकेकडे अर्ज सादर केले आहेत. व्यवसाय परवान्यासाठी विशेष शिबिराचे आयोजन केल्याबद्दल आयुक्त नितीन कापडणीस यांचेही केमिस्ट असोसिएशनच्यावतीने आभार मानले आहेत.
गुरुवारी दिवसभरात सांगली शहरातून ८५, मिरजेतून ५६, तर कुपवाडमधून ९ अशा एकूण १५० केमिस्ट बांधवांनी व्यवसाय परवान्यासाठी अर्ज दाखल केले आहेत. दोन दिवसात २२० केमिस्टनी प्रस्ताव दाखल केले, तर १४ केमिस्ट व्यावसायिकांनी परवान्याचे नूतनीकरण केले आहे. महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनीही शिबिरास भेट देऊन माहिती घेतली. यावेळी केमिस्ट असोसिएशनचे सांगली शहराध्यक्ष विजयकुमार पाटील उपस्थित होते.
सांगली व कुपवाडच्या व्यावसायिकांनी सांगली शहर केमिस्ट भवन, तर मिरजेत माधवपेठ याठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे. व्यवसाय परवाने न घेणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा वैद्यकीय आरोग्याधिकारी डाॅ. सुनील आंबोळे यांनी दिला आहे.