सांगलीतील संगीतमय मैफलीस प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2019 03:33 PM2019-12-03T15:33:54+5:302019-12-03T15:37:22+5:30

आकाशातून बरसणाऱ्या जलधारांना संगीतमयी स्वरांमध्ये चिंब भिजवीत सोमवारी सांगलीत रंगलेल्या संगीत मैफलीने रसिकांना अनोखी मेजवानी दिली. सहा प्रहरांना रागदारीत गुंफत गायक मुलांनी देसकार ते भैरवीपर्यंतची स्वरांची अनोखी गीतमाला सादर करीत रसिकांच्या हृदयांमध्ये आनंदलहरींना उधाण आणले.

Response to musical concerts in Sangli | सांगलीतील संगीतमय मैफलीस प्रतिसाद

सांगलीतील संगीतमय मैफलीस प्रतिसाद

googlenewsNext
ठळक मुद्देसांगलीतील संगीतमय मैफलीस प्रतिसादसांगली शिक्षण संस्थेच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजन

सांगली : आकाशातून बरसणाऱ्या जलधारांना संगीतमयी स्वरांमध्ये चिंब भिजवीत सोमवारी सांगलीत रंगलेल्या संगीत मैफलीने रसिकांना अनोखी मेजवानी दिली. सहा प्रहरांना रागदारीत गुंफत गायक मुलांनी देसकार ते भैरवीपर्यंतची स्वरांची अनोखी गीतमाला सादर करीत रसिकांच्या हृदयांमध्ये आनंदलहरींना उधाण आणले.

सांगली शिक्षण संस्थेच्या वर्धापनदिनानिमित्त सांगलीच्या बापट बाल शाळेच्या क्रीडांगणावर स्वर अहोरात्र हा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रसिद्ध हार्मोनियम वादक डॉ. अमोघ जोशी यांच्याहस्ते यांच्याहस्ते दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनाने करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष खाडिलकर, उपाध्यक्ष जनार्दन लिमये, शशिकांत देशपांडे, सतिश गोरे यांच्यासह सर्व संचालक, शिक्षक उपस्थित होते.

संस्थेच्या विविध शाळेतील आजी विद्यार्थ्यांनी गाणी सादर करताना मैफलीला उंची प्राप्त करून दिली. मैफलीची सुरुवात सकाळ प्रहरातील देसकार रागाने झाली. आदित्य ताम्हणकर याने उठी उठी गोपाळा, तन्वी खाडिलकरने तोडी रागातील भावभोळ््या भक्तिची, ओवी कुष्टे हिने गौडसारंग रागातील काल पाहिले मी स्वप्न गडे ही गीते सादर केली.

पुष्कर नाशिककरने भीमपलास रागातील तुझे गीत गाण्यासाठी, श्रीनिवास हसबनीस याने पिलू रागातील अजहून आये बालमा, आदित्य गानू याने मधुवंती रागातीलझन झननन छेडील्या तारा या गीतांमधून दुपार प्रहर रंगविली. श्रनिवास हसबनीस याने यमन रागातील जब दीप जले आना, आदित्य भोसले याने मारवा रागातील स्वरगंगेच्या काठावरती , आदित्य ताम्हणकरने राग शुद्ध कल्याणमधील जहॉ डाल डाल पर या सुंदर गीतांमधून सायंकाळ प्रहरीची चित्र रंगविले.

रात्र प्रहराचे रंग दर्शविताना उर्वी मराठे हिने भूप रागातील पंछी बनू उडती फिरू, शरयु कुलकर्णीने तिलक कामोद या रागातील गगन सदन, आदित्य भोसले याने देस रागातील मन मंदिरा तेजाने ही गीते सादर केली. आकांक्षा ताम्हणकरने मालकंस रागातील विसरशील खास मला, अनुष्का दांडेकरने बिहाग रागातील तेरे सुर और मेरे गीत, यश निरलगी याने दरबारी कानडा रागातील  तोरा मन दरपन या गीतांमधून मध्यरात्रीचा प्रहर जागविला.

अनुष्का कोळी हिने भैरव रागातील जागो मोहन प्यारे, यश निरलगीने अहिर भैरवमधील जय शंकरा गंगाधरा या गीतांमधून पहाटेच्या प्रहराचे रंग उधळले. शेवटी सर्व विद्यार्थ्यांनी मिळून कट्यार काळजात घुसली या नाटकातील सर्व प्रहर दर्शविणारी रागमाला सादर करून मैफलीची सांगता केली.

कार्यक्रमाचे संगीत संयोजन परेश पेठे यांनी केले. हार्मोनियम साथ भास्कर पेठे, बासरीसाथ कृष्णा साठे, की बोर्ड साथ निलेश मोहिते, ढालेक साथ अक्षय कुलकर्णी, तालवाद्य साथ सुमीत जमदाडे यांनी केले. संगीत दिग्दर्शन सं. गो. कुलकर्णी यांनी केले.

मैफलीत पावसाची हजेरी

संगीत मैफल रंगली असतानाच सोमवारी सायंकाळी पावसानेही हजेरी लावली. पावसाच्या साक्षीने कलाकारांनी तितक्याच स्वरधारांची अवीट बरसात करीत रसिकांना चिंब भिजविले. रसिकांनीही भर पावसात या मैफलीचा आनंद लुटला.

गायक, वादकांचा सत्कार

संस्थेच्यावतीने बहारदार मैफील रंगविणाºया गायक व वादकांचा सत्कार करण्यात आला. पुस्तक तसेच पुष्प देऊन त्यांना गौरविण्यात आले.

 

Web Title: Response to musical concerts in Sangli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.