मिरज सिव्हिलमध्ये थैलेसेमिया तपासणी शिबिरास प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 04:26 AM2021-02-13T04:26:17+5:302021-02-13T04:26:17+5:30

कोविड साथीदरम्यान रुग्णांना वेळेवर उपचार व आवश्यक त्या तपासण्या होऊ शकल्या नाहीत. अशा थैलेसेमियाग्रस्तांसाठी शिबिराचे आयोजन करण्यात आले ...

Response to Thalassemia Screening Camp in Miraj Civil | मिरज सिव्हिलमध्ये थैलेसेमिया तपासणी शिबिरास प्रतिसाद

मिरज सिव्हिलमध्ये थैलेसेमिया तपासणी शिबिरास प्रतिसाद

Next

कोविड साथीदरम्यान रुग्णांना वेळेवर उपचार व आवश्यक त्या तपासण्या होऊ शकल्या नाहीत. अशा थैलेसेमियाग्रस्तांसाठी शिबिराचे आयोजन करण्यात आले हाेते. यावेळी रक्त, डोळे, हाडे, दात, त्वचा, ईसीजी सोनोग्राफी तज्ज्ञ डॉक्टरांनी तपासण्या केल्या. जिल्ह्यात प्रथमच बोनमॅरो ट्रान्सप्लांट मॅचिंग एचएएल तपासणी करण्यात आली. डॉ. एम. बी, अगरवाल यांनी पालकांना मार्गदर्शन केले. प्रभारी अधिष्ठाता डॉ. प्रदीप दीक्षित यांनी मिरज सिव्हिलमध्ये थैेलेसिमिया सेंटरसाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. डॉ. नथानिएल ससे म्हणाले, रक्तविकारग्रस्त रुग्णांना उपचार सुविधा देण्यात येईल. रक्त विकार तज्ज्ञ डॉ. संदीप नेमाणी यांनी तीन जिल्ह्यांत एक बीएमटी सेंटर सुरू झाल्यास त्याचा फायदा रुग्णांना होईल, असे सांगितले. डॉ. शिशिर मिरगुंडे यांनी मुलांना लागणारी औषधे व दिव्यांग प्रमाणपत्र उपलब्ध करण्यात येतील, असे सांगितले. कोरोनाच्या काळात उल्लेखनीय काम करणाऱ्या प्रभारी अधिष्ठाता डॉ. प्रदीप दीक्षित, वानलेसचे संचालक डॉ. नथानिएल ससे, डॉ. संदीप नेमाणी, डॉ. भास्कर मूर्ती, डॉ. वनिता कुलकर्णी डॉ. करण पुजारी, डॉ. शिशिर मिरगुंडे, निसार मुल्ला, आजम जमादार, महंमदहनिफ तहसीलदार, शिवसेनेचे शंभूराज काटकर, ईलाही मुलाणी, कैस अलगूर यांचा सत्कार करण्यात आला. बरकत पन्हाळकर यांनी प्रास्ताविक केले. डॉ. इम्रान मुलाणी यांनी स्वागत केले. नरेश सचदेव, डॉ. संतोष चव्हाण, किशोर कांबळे, अरविंद धोंगडे, मुस्ताक मुल्ला, डॉ. विनायक मराळे, युनूस खतीब, संजय सकट, राजू देसाई, इकबाल नदाफ, टोपू चव्हाण यांनी संयोजन केेले.

फाेटाे : १२ मिरज २

Web Title: Response to Thalassemia Screening Camp in Miraj Civil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.