गैरव्यवहाराची जबाबदारी निश्चित होणार

By Admin | Published: December 15, 2014 10:54 PM2014-12-15T22:54:47+5:302014-12-16T00:11:53+5:30

जिल्हा बॅँक लेखापरीक्षण : दिग्गजांचे धाबे दणाणले, श्रीधर कोल्हापुरे यांच्याकडे कार्यभार

The responsibility for fraud will be fixed | गैरव्यवहाराची जबाबदारी निश्चित होणार

गैरव्यवहाराची जबाबदारी निश्चित होणार

googlenewsNext

सांगली : सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेतील तब्बल ४ कोटी १८ लाख १६ हजार रुपयांच्या गैरव्यवहाराची कलम ८८ नुसार चौकशी करण्यासाठी जिल्हा विशेष लेखापरीक्षक श्रीधर कोल्हापुरे यांची नियुक्ती करण्यात आली. कोल्हापूर विभागीय सहकारी संस्था सहनिबंधक राजेंद्रकुमार दराडे यांनी आज, सोमवारी त्यांच्या नियुक्तीचे आदेश दिले. याप्रकरणी काँग्रेस, राष्ट्रवादी व भाजपमधील दिग्गज आजी, माजी आमदार, मंत्र्यांची चौकशी होणार आहे. बँकेचे २00१-२00२ ते २0११-१२ या कालावधीतील कारभाराचे चाचणी लेखापरीक्षण चार्टर्ड अकौंटंट डी. ए. चौगुले यांनी केले असून, त्याचा अहवाल त्यांनी कोल्हापूर विभागीय सहनिबंधकांकडे २ मे २0१३ रोजी सादर केला होता. या अहवालात अनेक नियमबाह्य कामांवर ताशेरे ओढण्यात आले होते. यामध्ये बँकेच्या प्रधान कार्यालयाचे रंगकाम, दुरुस्ती, अमृतमहोत्सवी कार्यक्रमातील खर्च, नियमबाह्य नोकरभरती, इमारत बांधकामासाठी केलेला खर्च, बँक गॅरंटी शुल्क परत देण्याचा व्यवहार, बचत गट संघास दिलेले नियमबाह्य मानधन, निवृत्त अधिकाऱ्यांवर केलेला नियमबाह्य पगाराचा खर्च, जादा दराने केलेली सीसीटीव्ही खरेदी, एकरकमी परतफेड योजनेतील सवलत, संचालक मंडळांचा अभ्यास दौरा अशा अनेक गोष्टी निदर्शनास आल्या होत्या. या सर्व व्यवहारात व्यवस्थापनातील ज्या व्यक्तींचा सहभाग आहे, तसेच ज्या अधिकारी, संचालकांनी व्यवस्थापनाच्या निर्णयप्रक्रियेत सहभाग दाखविला, अशा लोकांनी अधिकाराचा गैरवापर करून बँकेच्या निधीचा दुरुपयोग केल्याचे अहवालात म्हटले होते. त्यानुसार बँकेस झालेले नुकसान निश्चित करण्यासाठी विभागीय सहनिबंधकांनी मिरज येथील सहकारी संस्था उपनिबंधक एम. एल. माळी यांची नियुक्ती केली होती. त्यांनी चौकशी पूर्ण करून आपला अहवाल दराडे यांच्याकडे नुकताच सादर केला. या अहवालात चार कोटी १८ लाख रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे उघडकीस आले. या प्रकाराने सहकार क्षेत्रात खळबळ उडाली होती. कलम ८३ खाली अहवाल प्राप्त झाल्यानंतर बँकेच्या काही संचालकांनी कलम ८८ खालील चौकशीला स्थगिती मिळावी, यासाठी शासनस्तरावर प्रयत्न चालविले होते. पण त्याला यश आले नाही. आज, सोमवारी कोल्हापूर विभागीय सहकारी संस्था सहनिबंधक राजेंद्रकुमार दराडे यांनी विशेष लेखापरीक्षक श्रीधर कोल्हापुरे यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती केल्याचे आदेश दिले. विहित मुदतीत चौकशी पूर्ण करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दराडे यांनी दिले आहेत. त्यामुळे या गैरव्यवहारात अडकलेल्या संचालकांचे धाबे दणाणले आहेत. (प्रतिनिधी) असे झाले गैरव्यवहार... प्रधान कार्यालय रंगकाम, दुरूस्ती : ४.६३ लाख सावळज, आटपाडी शाखा बांधकाम : १.२७ लाख वसंतदादा कारखाना बँक गॅरंटी : २१६.५५ लाख वाळवा तालुका बचत गट मानधन : ६३.४७ लाख निवृत्त अधिकारी पगार खर्च : ६.८१ लाख सीसीटीव्ही कॅमेरा खरेदी : ५६ हजार जादा दराने सिक्यिुरिटी अलार्म खरेदी : ४.१७ लाख नियमबाह्य ओटीएस : ४६.०५ लाख संचालक मंडळ अभ्यास दौरा : ९८ हजार जादा दराने संगणक खरेदी : ७३.६७ लाख लिपिक, शिपायांची बेकायदेशीर भरती

Web Title: The responsibility for fraud will be fixed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.