विधानसभा निवडणुकीवर होणार परिणाम
By Admin | Published: May 18, 2014 12:18 AM2014-05-18T00:18:31+5:302014-05-18T00:20:03+5:30
सांगली : नरेंद्र मोदी लाटेने काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला खिंडार पडल्यामुळे आगामी चार महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीत आपले काय होणार?
सांगली : नरेंद्र मोदी लाटेने काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला खिंडार पडल्यामुळे आगामी चार महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीत आपले काय होणार? असा घोर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आमदारांना लागला आहे. राष्ट्रवादीतील अनेक दिग्गज नेते मोदी लाटेवर स्वार होऊन विधानसभा लढविण्याच्या तयारीत असल्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीसमोर मोठे आव्हान निर्माण होणार आहे. सांगली लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ असून, सांगलीतून संभाजी पवार, मिरजेतून सुरेश खाडे आणि जत येथून प्रकाश शेंडगे हे भाजपचे तीन आमदार आहेत. तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघातून गृहमंत्री आर. आर. पाटील राष्ट्रवादीचे एकमेव, तर कडेगाव-पलूसमधून पालकमंत्री डॉ. पतंगराव कदम आणि खानापूर-आटपाडीत सदाशिवराव पाटील हे काँग्रेसचे दोन आमदार निवडून आले आहेत. भाजपची ताकद याठिकाणी दिवसेंदिवस वाढत आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत आर. आर. पाटील यांच्याविरोधात भाजपकडून अजितराव घोरपडेंना उतरविण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. दुसरीकडे राष्टÑवादीचे माजी आमदार दिनकर पाटीलही सांगली विधानसभेसाठी भाजपकडून इच्छुक आहेत. (प्रतिनिधी)