रेठरे हरणाक्षला शिवार फेरीचे आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:27 AM2021-02-24T04:27:48+5:302021-02-24T04:27:48+5:30
रेठरे हरणाक्ष (ता. वाळवा) येथे शिवार फेरीवेळी उमेश पवार यांनी शेतकºयांना मार्गदर्शन केले. यावेळी बी. डी. पवार, भगवानराव ...
रेठरे हरणाक्ष (ता. वाळवा) येथे शिवार फेरीवेळी उमेश पवार यांनी शेतकºयांना मार्गदर्शन केले. यावेळी बी. डी. पवार, भगवानराव माने, अमोल कोळी उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
शिरटे : रेठरे हरणाक्ष (ता. वाळवा) येथे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचे वाढदिवसाचे औचित्य साधून कृषी पदवीधर संघ इस्लामपूर, राजारामबापू कॉलेज ऑफ शुगर टेक्नालॉजी इस्लामपूर, बायर क्रॉप सायन्स, पशुपती विकास सोसायटी व ग्रामपंचायत यांचे संयुक्त विद्यमाने शिवार फेरीचे आयोजन करण्यात आले होते.
सकाळी इस्लामपूर येथे राजारामबापू कारखान्याचे अध्यक्ष पी. आर. पाटील यांचेहस्ते व कृषी पदवीधर संघाचे अध्यक्ष बाबासाहेब पवार यांचे प्रमुख उपस्थितीत शिवार फेरी व इतर पिकांतील हुमणी किड नियंत्रण या परिसंवादाचे उद्घाटन करण्यात आले.
रेठरे हरणाक्ष फाट्यापासून डोंगर व रेल्वेलाईन परिसरात शिवार फेरी काढत प्रा. पांडुरंग मोहिते यांनी प्रत्यक्ष शेतकऱ्यांशी संवाद साधत हुमणी व इतर किडीविषयी उपाययोजनांबाबत मार्गदर्शन केले शिवार फेरीमध्ये कृषी पदवीधर संघाचे अध्यक्ष बाबासाहेब पवार, तालुका कृषी अधिकारी भगवानराव माने, पं. स. चे कृषी अधिकारी अमोल कोळी व बायर क्रॉफ सायन्सचे राहुल तकाटे यांनी सहभाग घेत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.