रेठरे धरणला कोरोना रुग्ण रस्त्यावर, गावात भीतीचे वातावरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:27 AM2021-05-26T04:27:51+5:302021-05-26T04:27:51+5:30
जिल्ह्यात दुसऱ्या लाटेतही पहिला रुग्ण फेब्रुवारीत बचाक्कानगर परिसरात सापडला होता. मार्च महिन्यात बचाक्कानगर येथे वृद्धेच्या मृत्यूनंतर अंत्यसंस्कार व रक्षाविसर्जन ...
जिल्ह्यात दुसऱ्या लाटेतही पहिला रुग्ण फेब्रुवारीत बचाक्कानगर परिसरात सापडला होता. मार्च महिन्यात बचाक्कानगर येथे वृद्धेच्या मृत्यूनंतर अंत्यसंस्कार व रक्षाविसर्जन कार्यक्रमात गर्दी केल्यावर कोरोना रुग्ण वाढले होते. तेथील तीन व्यक्ती व नातेवाईक तीन अशा ६ व्यक्ती कोरोनाच्या संसर्गाने दगावल्या होत्या.
तेथून रुग्ण वाढत गेले. लोकांचा निष्काळजीपणा वाढीस कारणीभूत ठरत आहे. गावात काही खासगी डॉक्टर, वैद्यकीय अधिकारी जितेंद्र मोरे, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. प्रियांका सूर्यवंशी, आरोग्य सेविका स्वाती सुतार यांच्यासह आशा वर्कर व अंगणवाडी सेविका यांच्यावरील कामाचा ताण वाढला आहे.
मंगळवारी सकाळी ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच लतिका पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आपत्ती व्यवस्थापन कमिटी, पोलीस अधिकारी यांची बैठक झाली. त्यावेळी गावात गृह विलगीकरणातील कोरोना रुग्ण रस्त्यावर खुलेआम फिरत असल्याची काही सदस्यांनी तक्रार केली. यावर सहायक पोलीस निरीक्षक अनिल जाधव यांनी रुग्ण जर दुकानात दूध घालावयास येत असतील, तर त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले.