रेठरे धरणला उसाला आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:27 AM2021-01-25T04:27:24+5:302021-01-25T04:27:24+5:30
रेठरे धरण ते माणिकवाडी रस्त्यावरील इनामसर्द नावाने परिचित असलेल्या उसाच्या फडास दुपारी अचानक विद्युत तारांमधील शॉक सर्किटने आग लागली. ...
रेठरे धरण ते माणिकवाडी रस्त्यावरील इनामसर्द नावाने परिचित असलेल्या उसाच्या फडास दुपारी अचानक विद्युत तारांमधील शॉक सर्किटने आग लागली. निवृत्ती रघुनाथ पाटील, शामराव विठू पाटील, बाजीराव आत्माराम पाटील, यांचा प्रत्येकी एक एकर तसेच महादेव पंढरीनाथ पाटील, विलास श्रीपती मुळीक, संभाजी सर्जेराव पाटील, यांचा प्रत्येकी २० गुंठे क्षेत्रातील ऊस जळून खाक झाला.
दुपारच्या सुमारास ऊन व वाऱ्याचा झोत असल्याने चार एकर परिसरातील उसाला आगीने पूर्णपणे वेढा दिला होता. आग लागल्याचे समजताच शेतकऱ्यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला; परंतु आग आटोक्यात आली नाही. तोपर्यंत ऊस जळून नुकसान झाले. राजारामबापू साखर कारखान्याच्या व्यवस्थापनाने लगेचच जळालेला ऊस तोडून कारखान्यास नेण्यास सुरुवात केली. ऊस जळाल्याने शेतकऱ्यांना टनाला ३०० रुपये कपात सोसावी लागणार आहे.