आष्टा येथे सेवानिवृत्त एसटी कर्मचाऱ्यांच्यावतीने ‘आपुलकीचा हात’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 04:41 AM2020-12-16T04:41:12+5:302020-12-16T04:41:12+5:30
आष्टा : येथील सेवानिवृत्त एसटी कर्मचारी संघटनेच्यावतीने ‘आपुलकीचा हात’ ही संकल्पना राबविण्यात आली. या संकल्पनेला नागरिकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला. ...
आष्टा : येथील सेवानिवृत्त एसटी कर्मचारी संघटनेच्यावतीने ‘आपुलकीचा हात’ ही संकल्पना राबविण्यात आली. या संकल्पनेला नागरिकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला.
ज्योतिर्लिंग चौक येथे संस्थेच्या कार्यकर्त्यांकडून जुने कपडे गोळा करण्यात आले. नागरिकांनी घरामध्ये असलेले जुने कपडे याठिकाणी जमा केले. गरजू लोकांनी आवडीने पसंत करून कपडे घरी नेले. डवरी समाजाची वस्ती व नागाव रस्ता येथे असलेल्या वस्तीमध्ये कपडे देण्यात आले. सेवानिवृत्त एसटी संघटनेने राबविलेल्या या उपक्रमाचे सर्वांनी कौतुक केले.
सेवानिवृत्त एसटी कर्मचारी संघटनेचे अब्बास लतीफ, मारुतीराव सावंत, संग्राम शिंदे, विक्रम भाेपे, वसंत कांबळे, अशोक मदने, शहाजहान जमादार, डी. एस. कोळी, बाळासाहेब गायकवाड, विजय कदम, शेरखान मुजावर, किरण जाधव, सिराज मुजावर, दलितमित्र शामराव शेळके, दिलीप बासर, सुभाष कुलकर्णी, राजाराम मोरे, सेवानिवृत्त शिक्षक संघटनेचे महादेव झांबरे व सहकारी नागरिक उपस्थित होते.
फोटो : १५१२२०२०-आयएसएलएम-आष्टा न्यूज
ओळ :
सेवानिवृत्त एसटी कर्मचारी संघटनेच्यावतीने ‘आपुलकीचा हात’ संकल्पनेतून अब्बास लतीफ, मारुतीराव सावंत, संग्राम शिंदे, शहाजान जमादार, विक्रम भाेपे, सुभाष कुलकर्णी, महादेव झांबरे यांनी गरजूंना कपडे वाटप केले.