ऊसताेडणी मजुरांना परतीचे वेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 04:25 AM2021-02-13T04:25:18+5:302021-02-13T04:25:18+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क वाळवा : बारातेरा दिवसांनी कर्नाटकातील रायबाग तालुक्यातील चिंचलीच्या मायाक्कादेवीची यात्रा आहे. या यात्रेला ऊसतोडणी वाहतूक करणाऱ्या ...

Return of sugarcane workers | ऊसताेडणी मजुरांना परतीचे वेध

ऊसताेडणी मजुरांना परतीचे वेध

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

वाळवा : बारातेरा दिवसांनी कर्नाटकातील रायबाग तालुक्यातील चिंचलीच्या मायाक्कादेवीची यात्रा आहे. या यात्रेला ऊसतोडणी वाहतूक करणाऱ्या बऱ्याच बैलगाड्या जातात. यंदा यात्रांवर काेराेनाचे सावट असले, तरी ऊसतोड मजुरांनी यात्रेची तयारी चालविली आहे. यातील बऱ्याच बैलगाड्या परस्पर गावाकडे रवाना हाेतात. अद्याप कार्यक्षेत्रातील बराच ऊस शिल्लक आहे. वेळेत ऊसतोडी मिळत नाहीत. त्यामुळे शेतकरी धास्तावले आहेत. परिणामी, ऊसतोड मजूर व वाहतूकदारांचे तोडीसाठी हात ओले करावे लागत आहेत.

गेल्या वर्षी महापुरात सापडलेल्या आडसाली उसाला अद्याप तोडी नसल्याने अनसे फुटले आहेत. त्यामुळे ऊस उत्पादनात मोठी घट हाेणार आहे. २६५ या उसाला तर संपूर्ण तुरे येऊन ऊस पोकळ होत चालला आहे. कोरोना आणि दुष्काळग्रस्त भागात सातत्याने झालेली अतिवृष्टी याचा ऊसतोडणीस येणाऱ्या मजुरांच्या संख्येवर मोठा परिणाम झाला आहे. कोरोनामुळे लोक बाहेर पडले नाहीत. पाऊस खूप झाल्याने त्यांची शेती फुलली आहे. घरच्या शेतीतील कामे सोडून ऊसतोडणी वाहतुकीस त्यांनी पाठ फिरवली आहे. यामुळे सगळ्याच कारखान्यांना कमीजास्त प्रमाणात ऊसतोडणी मजुरांचा प्रश्न भेडसावत आहे. ऊसतोडणीयंत्रे अद्याप सर्रास उपलब्ध नाहीत. जी आहेत ती काळ्या व चिकट जमिनीत व्यवस्थित चालत नाहीत. परिणामी, काही शेतकरीमालक ऊसतोड करून फड मोकळे करत आहेत. मालक ऊसतोडीची मजुरी अव्वाच्या सव्वा आहे. एवढे करूनही ऊसतोडणी वाहतूक करणारांचे हात ओले करावे लागत आहेत.

पंधरा दिवसांत उन्हाळा सुरू होईल. चिंचली यात्रेदरम्यान आहे त्यातीलही ऊसतोडणी मजूर निघून जातील. अद्याप लागणीचा ऊस शिल्लक आहे. तेव्हा या ऊसतोडी संपणार कधी, असा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत आहे. यावर पर्यायी मार्ग शोधणे गरजेचे आहे, अन्यथा नगदी पैसा मिळवून देणारी ऊसशेती अडचणीत येणार आहे.

Web Title: Return of sugarcane workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.