महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले नायकवडी कुटुंबियाचे सांत्वन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2019 12:52 PM2019-07-20T12:52:18+5:302019-07-20T12:53:14+5:30
क्रांतिवीर नागनाथ अण्णा नायकवडी यांच्या पत्नी कुसुमताई नायकवडी यांचे वयाच्या 87 व्या वर्षी दिनांक 17 जुलै रोजी मिरजच्या मिशन हॉस्पिटलमध्ये निधन झाले. महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज वाळवा येथे नायकवडी कुटुंबियांची भेट घेवून वैभव नायकवडी, किरण नायकवडी, गौरव नायकवडी यांचे सांत्वन केले व त्यांना धीर दिला.
सांगली : क्रांतिवीर नागनाथ अण्णा नायकवडी यांच्या पत्नी कुसुमताई नायकवडी यांचे वयाच्या 87 व्या वर्षी दिनांक 17 जुलै रोजी मिरजच्या मिशन हॉस्पिटलमध्ये निधन झाले. महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज वाळवा येथे नायकवडी कुटुंबियांची भेट घेवून वैभव नायकवडी, किरण नायकवडी, गौरव नायकवडी यांचे सांत्वन केले व त्यांना धीर दिला.
यावेळी त्यांच्या समवेत आमदार सुधीर गाडगीळ, सांगली मिरज कुपवाड महापालिकेच्या महापौर संगीता खोत, इस्लामपूरचे नगराध्यक्ष निशीकांत पाटील यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
यावेळी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, स्वातंत्र्य चळवळीत क्रांतीवीर नागनाथ अण्णांच्या योगदानात माईंनी हिरीरीने साथ दिली. स्वातंत्र्य प्राप्तीनंतरही त्यांनी सामाजिक कार्याचा वसा जोपासला.