‘सहकारी जगत’मुळे सहकार चळवळीचा आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 04:22 AM2021-01-15T04:22:18+5:302021-01-15T04:22:18+5:30
वारणानगर येथे पश्चिम महाराष्ट्र प्रादेशिक सहकारी संघ यांच्यावतीने प्रकाशित होणाऱ्या सहकारी जगतच्या विशेषांकाच्या प्रकाशनावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पश्चिम ...
वारणानगर येथे पश्चिम महाराष्ट्र प्रादेशिक सहकारी संघ यांच्यावतीने प्रकाशित होणाऱ्या सहकारी जगतच्या विशेषांकाच्या प्रकाशनावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पश्चिम महाराष्ट्र प्रादेशिक सहकारी संघाचे अध्यक्ष डॉ. प्रताप पाटील होते.
निपुण कोरे म्हणाले, बदलत्या धोरणानुसार सहकारामध्ये मोठ्या प्रमाणात परिवर्तन होऊ लागले आहे. सहकारामध्ये सामान्य माणसांचे स्थान कमी होत असून याला जबाबदार सरकारी यंत्रणा आहे. अनेक वर्षांपासून सहकार व सहकारी संस्थांची असलेली परंपरा ही सध्याच्या धोरणात्मक निर्णयामुळे खिळखिळी होण्याची भीती निर्माण झाली आहे. यासाठी सर्वच स्तरावर अभ्यास होणे आवश्यक आहे.
डॉ. प्रताप पाटील म्हणाले, ‘सहकारी जगत’च्या अंकातून सहकारातील विविध विषयांची हाताळणी केली जाते. त्या माध्यमातून सहकाराबद्दलचे प्रबोधन करण्याचा प्रयत्न सातत्याने केला जात आहे.
डॉ. सुरज चौगुले यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी वारणा बँकेचे उपाध्यक्ष प्रमोद कोरे, वारणा शिक्षण संस्थेचे विश्वस्त बाबासाहेब पाटील, वारणा सहकारी बँकेचे संचालक व वारणा महाविद्यालयातील डॉ. प्रदीप कांबळे उपस्थित होते. डॉ. भारत उपाध्ये यांनी आभार मानले.
फोटो-१४कुरळप१