सहकारी संस्थांच्या निवडणुकीबाबत आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 04:25 AM2020-12-29T04:25:38+5:302020-12-29T04:25:38+5:30
सांगली : जिल्ह्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुकांबाबत सध्या आढावा घेण्याचे काम सहकारी विभागामार्फत सुरू झाले आहे. पुढील वर्षी जानेवारीपासून याच्या ...
सांगली : जिल्ह्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुकांबाबत सध्या आढावा घेण्याचे काम सहकारी विभागामार्फत सुरू झाले आहे. पुढील वर्षी जानेवारीपासून याच्या प्रक्रियेला वेग येणार आहे.
सांगली जिल्ह्यातील सहकारी संस्थांची संख्या ३ हजार ५९८ इतकी आहे. २०२० मध्ये १ हजार ४२९ सहकारी संस्था निवडणुकीस पात्र आहेत. त्यात ‘अ’ व ‘ब’ या मोठ्या वर्गातील व ज्यांचे कार्यक्षेत्र जिल्ह्याबाहेर विस्तारलेले आहे अशा संस्थांचाही समावेश आहे. निवडणुका लांबणीवर गेलेल्या संस्थांमध्ये सोसायट्यांची संख्या सर्वाधिक आहे. जिल्हा मध्यवर्ती बँक, बाजार समिती, नागरी बँकांसह मोठ्या पतसंस्थांचाही यात समावेश आहे.
डिसेंबर २०१९ मध्येच सहकारी संस्थांच्या निवडणुकांची तयारी सहकार विभागामार्फत चालू झाली होती. त्यानंतर कर्जमाफीच्या प्रक्रियेमुळे यातील सहकारी संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया काही काळ लांबणीवर पडली. ही प्रक्रिया सुरू होईल असे वाटत असतानाच कोरोनामुळे देशभरात लॉकडाऊन करण्यात आले. त्यानंतर पुन्हा राज्य शासनाने सहकारी संस्थांच्या निवडणुका लांबणीवर टाकल्या. आता नव्या वर्षात या निवडणुकांना मुहूर्त लागणार आहे.