‘क्रांती’चे दहा लाख टन गाळपाचे उद्दिष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:17 AM2021-07-12T04:17:35+5:302021-07-12T04:17:35+5:30

फोटो ओळ : कुंडल (ता. पलूस) येथील क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखान्याच्या मिल रोलर पूजनप्रसंगी ...

‘Revolution’ aims to grind one million tons | ‘क्रांती’चे दहा लाख टन गाळपाचे उद्दिष्ट

‘क्रांती’चे दहा लाख टन गाळपाचे उद्दिष्ट

Next

फोटो ओळ : कुंडल (ता. पलूस) येथील क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखान्याच्या मिल रोलर पूजनप्रसंगी कारखान्याचे अध्यक्ष अरुण लाड, उपाध्‍यक्ष उमेश जोशी, उद्योजक उदय लाड, क्रांती दूध संघाचे अध्यक्ष किरण लाड, संचालक, अधिकारी उपस्थित होते.

पलूस : क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखान्याच्‍या २०२१-२२ च्‍या २० व्‍या गाळप हंगामामध्‍ये १० लाख टन उसाचे गाळप करण्‍याचे उद्दिष्‍ट आहे. यासाठी कारखान्याची सर्व यंत्रणा सज्‍ज आहे, असे प्रतिपादन कारखान्याचे अध्‍यक्ष अरुण लाड यांनी केले.

कुंडल (ता. पलूस) येथील क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखान्याच्या गाळप हंगामाच्‍या मिल रोलर पूजन कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. उपाध्‍यक्ष उमेश जोशी, उद्योजक उदय लाड, क्रांती दूध संघाचे अध्‍यक्ष किरण लाड, जिल्हा परिषद सदस्य नितीन नवले प्रमुख उपस्थित होते.

अरुण लाड म्‍हणाले, कारखान्याकडे सद्य:स्थितीला ११ हजार ९०० हेक्‍टर ऊस नोंद आहे. यातून १० लाख टन उद्दिष्‍ट ठेवले आहे. १५ जुलैपर्यंत उसाच्‍या नोंदी घेण्‍याचे काम सुरू आहे. त्‍यामुळे ज्‍यांच्‍या नोंदी अद्याप राहिल्‍या आहेत, त्‍यांनी सत्‍वर करून घ्‍याव्‍यात, असे आवाहन त्‍यांनी यावेळी केले.

यावेळी कारखान्‍याचे माजी उपाध्‍यक्ष दिलीप पाटील, भीमराव महिंद, सुरेश शिंगटे, दादा पाटील, संचालक रामदास सावंत, महावीर ऊर्फ प्रशांत चौगुले, संदीप पवार, नारायण पाटील, जयप्रकाश साळुंखे, पोपट संकपाळ, अंकुश यादव, पोपट फडतरे, कुंडलिक थोरात, आदी उपस्थित होते.

110721\20210711_102007.jpg

फोटो

Web Title: ‘Revolution’ aims to grind one million tons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.