आरएफआयडी पेट्रोलिंगला निधी नसल्याने लागतोय ‘ब्रेक’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:27 AM2021-01-25T04:27:41+5:302021-01-25T04:27:41+5:30
सांगली : शहरातील वाढत्या घरफोड्या आणि इतर घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी रात्री सर्व उपनगरांमध्ये गस्त चालू असलीतरी आरएफआयडी या तंत्राद्वारे ...
सांगली : शहरातील वाढत्या घरफोड्या आणि इतर घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी रात्री सर्व उपनगरांमध्ये गस्त चालू असलीतरी आरएफआयडी या तंत्राद्वारे होणाऱ्या गस्तीला निधीमुळे ब्रेक लागत आहे. शहरातील तीन पोलीस ठाण्याकडील चार वाहने व पंधरांहून अधिक दुचाकींचा यासाठी वापर केला जात आहे. पेट्रोलिंगसाठी असलेल्या पोलीस पथकाला पेट्रोलसाठी निधी मिळाल्यास पोलीस यंत्रणेवरील ताण कमी होणार आहे.
शहरात गस्त घालताना त्या ठिकाणी पोलीस पोहोचले की नाही याच्या पाहणीसाठी रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन अर्थात आरआयडी तंत्राद्वारे गस्तीचे नोंदणी होत आहे. यासाठी शहरात ७५हून अधिक ‘स्पॉट’ निश्चित करण्यात आले आहेत. तीन पोलीस ठाण्याचे कर्मचारी याठिकाणी जाऊन नोंदणी करत आहेत. मात्र, या गस्तीसाठी पोलिसांना फिरताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे रात्री गस्तीसाठी असलेल्या पथकासाठी निधीची तरतूद महत्त्वाची ठरत आहे.
चौकट
घरफोडीचे सत्र सुरूच
अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांचे वेगवेगळी पथके तयार करून रात्रीच्या गस्तीचे नियोजन पोलीस ठाण्याकडून होत आहे. पोलीसही सर्वत्र फिरून गस्तीवर असतानाही शहरातील चोरी, घरफोडींचे सत्र सुरूच आहे. गस्त घालून पोलीस पुढे गेल्यानंतर मागे घरे फोड्ण्यात आल्याच्या घटना घडल्या आहेत.
चौकट
शहराचा वाढता विस्तार आव्हानात्मक
वाढत्या नागरिकरणामुळे पोलिसांवर मर्यादा येत आहेत. शहराला लागूनच राष्ट्रीय महामार्ग जात असल्याने चोरी, घरफोडीचे आव्हान वाढतच आहे. पोलीस गस्तीवर असतानाही चोऱ्या, घरफोड्या होतच असल्याने गस्त आणि पोलिसांचे काम झोकाळून जात आहे.
चौकट
अपार्टमेंटची सुरक्षा वाऱ्यावरच
शहरातील अपार्टमेंटमध्ये सुरक्षा रक्षकाची नेमणूक करावी याबाबत पोलीसांनी सूचना दिल्या आहेत. शहरातील अपवाद वगळता बहूतांश अपार्टमेंटमध्ये रक्षक नसल्याने फ्लॅट फोडून चोरीचे प्रकार वाढले आहेत. पोलीस अपार्टमेंटच्या संपूर्ण इमारतीमध्ये फिरून गस्त घालू शकत नसल्याने सुरक्षा रक्षकांची नेमणूक गरजेची ठरली आहे.
चौकट
पोलीस गस्तीवरील वाहने २०
चारचाकी वाहने ४
दुचाकी वाहने १६
कर्मचाऱ्यांची नियुक्ती ६०
कोट
शहरातील चोरीच्या घटना कमी करण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. संबंधीत पोलीस ठाण्याच्या प्रभारींनाही याबाबत सूचना दिल्या आहेत. पेट्रोलिंगसाठी असलेल्या कर्मचाऱ्यांना सुविधा पुरविण्यास प्राधान्य देण्यात येत आहे.
अजित टिके, पोलीस अधीक्षक