‘कुसूमताई’ची ऋषिका साळुंखे ९९.७२ टक्के मिळवून प्रथम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 04:25 AM2020-12-22T04:25:31+5:302020-12-22T04:25:31+5:30
इस्लामपूर : येथील कासेगाव शिक्षण संस्थेच्या श्रीमती कुसुमताई राजारामबापू पाटील कन्या महाविद्यालयाने एचएससी बोर्ड, नीट व सीईटी परीक्षेत उज्वल ...
इस्लामपूर : येथील कासेगाव शिक्षण संस्थेच्या श्रीमती कुसुमताई राजारामबापू पाटील कन्या महाविद्यालयाने एचएससी बोर्ड, नीट व सीईटी परीक्षेत उज्वल यश मिळविण्याची परंपरा कायम ठेवली, अशी माहिती प्राचार्य डॉ. राजेंद्र कुरळपकर यांनी दिली. ऋषिका साळुंखे हिने ९९.७२ टक्के गुण मिळवून महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकाविला.
कुरळपकर म्हणाले की, महाविद्यालयाने गेल्या १२ वर्षांत राबविलेल्या कन्या पॅटर्नमुळे हे यश मिळाले आहे. आजअखेर १०० पेक्षा जास्त विद्यार्थिनींना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळाला आहे; तर ५०० पेक्षा जास्त विद्यार्थिनींना राज्यातील नामवंत अभियांत्रिकी शाखेकडे प्रवेश मिळाला आहे. यावर्षी महाविद्यालयातील १२ विद्यार्थिनींना ‘इन्स्पायर’ स्कॉलरशिप प्राप्त झाली आहे. नीट परीक्षेत ऋषिका राजेंद्र साळुंखे हिला ४१२ गुण, तर सीईटीमध्ये ९९.७२ टक्के गुण मिळाले आहेत. पीसीबी सीईटीमध्ये ऐश्वर्या भोसले ९८.८४, संज्योत मंडले ९६.२३, अर्पिता चव्हाण ९६, मनीषा जगताप ९३.१३, साक्षी उपाध्ये ९३, सानिका चव्हाण ९३, आदिती जगताप ९२.३४, ईशा पाटील ९०.३१, ऋतुजा पाटील ९० टक्के गुण मिळवून उत्तुंग यश मिळविले आहे.
अभियांत्रिकी सीईटीत ऋतुजा पाटील ९७.६७, प्रतीक्षा पाटील ९७, सबा मोमीन ९६.४८, नेहा पाटील ९२.७२, सायली वाटेगावकर ९०, गिरिजा मोदुगडे ८९.७५, मानसी गुरव ८९.७५, दीप्ती पाटील ८९.५० टक्के गुण मिळाले आहेत, तर धनश्री चव्हाण, सबा मोमीन व ऋतुजा पाटील या तीन विद्यार्थिनींना गणित या विषयात १०० गुण मिळाले आहेत.
क्रॅश कोर्समधील प्राची पाटील हिला पीसीएममध्ये ९०.४५ मिळाले आहेत. या विद्यार्थिनींना प्रा. बी. जी. शिंदे, प्रा. मंजुषा कुलकर्णी, प्रा. उज्वला पाटील, प्रा. उदयकुमार कदम यांचे मार्गदर्शन लाभाले. संस्थेचे मार्गदर्शक जलसंपदा मंत्री जयंत पाटील, संस्थेचे अध्यक्ष शामराव पाटील, सचिव प्राचार्य आर. डी. सावंत, सहसचिव व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र कुरळपकर, पर्यवेक्षक प्रा. दशरथ पाटील, समन्वयक प्रा. शेखर वांजपे व सी. ई. टी. सेल इनचार्ज प्रा. पी. बी. पाटील यांनी यशस्वीतांचे अभिनंदन केले.
फोटो -२११२२०२०-आयएसएलएम-ऋषिका साळुंखे