ग्रामीण भागात कोरोनाचा धोका वाढला, दुसऱ्या लाटेत तब्बल १३५ मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:28 AM2021-04-23T04:28:06+5:302021-04-23T04:28:06+5:30

सांगली : जिल्ह्यातील शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागातील कोरोना रुग्णांच्या मृत्यूचे आकडे चिंताजनक आहेत. मार्च २०२१नंतर आलेल्या दुसऱ्या लाटेत ...

The risk of corona increased in rural areas, with 135 deaths in the second wave | ग्रामीण भागात कोरोनाचा धोका वाढला, दुसऱ्या लाटेत तब्बल १३५ मृत्यू

ग्रामीण भागात कोरोनाचा धोका वाढला, दुसऱ्या लाटेत तब्बल १३५ मृत्यू

Next

सांगली : जिल्ह्यातील शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागातील कोरोना रुग्णांच्या मृत्यूचे आकडे चिंताजनक आहेत. मार्च २०२१नंतर आलेल्या दुसऱ्या लाटेत जिल्ह्यातील ग्रामीण भागातील तब्बल १३५ कोविड रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ऑक्सिजन बेड मिळत नसल्याने पन्नास किलोमीटरहून अधिक दूर जाऊन रुग्णांना व नातेवाईकांना धावाधाव करावी लागत आहे.

जिल्ह्यातील दुष्काळी भागातील रुग्णांचे अधिक हाल होत आहेत. ग्रामीण भागातील वैद्यकीय सुविधांची मर्यादा, खासगी रुग्णालयांची कमतरता तसेच तालुक्याच्या ठिकाणी जाताना कापावे लागणारे मोठे अंतर यामुळे कोरोना रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांचे हाल होत आहेत. कोरोनाची दुसरी लाट मार्च महिन्यात सुरु झाली. या लाटेत जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील तब्बल १३५ जणांचा मृत्यू झाला. सद्यस्थितीत शहरी व ग्रामीण भागातील मृत्यूदराचा विचार केल्यास शहरी भागातील मृत्यूदर ३.०७ इतका असून, ग्रामीण भागातील मृत्यूदर ३.११ इतका आहे. त्यामुळे ग्रामीण भागात अधिक सतर्कता बाळगावी लागणार आहे.

चौकट

तालुकानिहाय रुग्ण

आटपाडी ३८५६

जत ३४६२

कडेगाव ४२४१

कवठेमहांकाळ ३०९७

खानापूर ४६४७

मिरज ५९८०

पलूस ३२११

शिराळा ३०२३

तासगाव ४५१३

वाळवा ७७२८

चौकट

तालुकानिहाय मृत्यू

आटपाडी ४७

जत ८३

कडेगाव ८४

कवठेमहांकाळ ११०

खानापूर १२३

मिरज २३३

पलूस १२४

शिराळा ७६

तासगाव १८६

वाळवा ३०३

चौकट

ऑक्सिजन व आयसीयु बेडस

तालुका ऑक्सिजन आयसीयु

आटपाडी ५० १४

जत १२५ २६

कवठेमहांकाळ ७५ १५

वाळवा ४०४ १२९

विटा १३२ ४७

शिराळा १४५ १२

पलूस १७५ १४

तासगाव १११ १८

कडेगाव ८५ ११

मिरज ५९६ ४१२

चौकट

पन्नास किलोमीटरपेक्षा अधिक भटकंती

जत पूर्व भागातील आसंगी, सोनलगी या गावातील ऑक्सिजनची गरज असलेल्या रुग्णांना माडग्याळ किंवा जतला यावे लागते. हे अंतर ३६ किलोमीटरचे आहे. तिथेही बेड मिळाला नाही तर अन्य तालुक्यांना किंवा सांगलीला १२३ किलोमीटरचे अंतर कापावे लागते. तीच परिस्थिती आटपाडी तालुक्यातील आहे. याठिकाणच्या झरे परिसरातील ऑक्सिजनची आवश्यकता असलेल्या रुग्णाला आटपाडीत ३४ किलोमीटरचे अंतर कापून जावे लागते. झरेपासून सांगलीचे अंतर ८५ किलोमीटर आहे. अशी धावाधाव रुग्णांना व नातेवाईकांना करावी लागते.

चौकट

मृत्यू

पहिल्या लाटेत ऑक्सिजन वेळेत न मिळाल्याने जवळपास शंभरावर कोरोना बाधितांचा मृत्यू झाल्याचा अंदाज येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे. दुसऱ्या लाटेतही अशीच परिस्थिती निर्माण होण्याची भीती आहे.

Web Title: The risk of corona increased in rural areas, with 135 deaths in the second wave

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.