आर.आय.टी. डिप्लोमामार्फत टॅलेंट हंटला प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:22 AM2021-07-17T04:22:05+5:302021-07-17T04:22:05+5:30
इस्लामपूर : कासेगाव एज्युकेशन सोसायटीच्या राजारामबापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या डिप्लोमा विभागामार्फत आयोजित टॅलेंट हंट या ऑनलाईन बुद्ध्यांक चाचणीला उर्त्स्फूत ...
इस्लामपूर : कासेगाव एज्युकेशन सोसायटीच्या राजारामबापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या डिप्लोमा विभागामार्फत आयोजित टॅलेंट हंट या ऑनलाईन बुद्ध्यांक चाचणीला उर्त्स्फूत प्रतिसाद मिळाला. सध्या कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शाळा, महाविद्यालये ऑनलाईन पद्धतीने सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचा शैक्षणिक व व्यक्तिमत्त्व विकास केंद्रस्थानी धरून या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
या स्पर्धेमध्ये सांगली, सातारा व कोल्हापूर या जिल्ह्यातून ६४९ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. ३० विद्यार्थ्यांची द्वितीय फेरीकरिता निवड करण्यात आली. द्वितीय फेरीमध्ये ऑनलाईन मुलाखतींच्या माध्यमातून या सर्व विद्यार्थ्यांचे मूल्यांकन केले गेले. व्यक्तिमत्त्व विकास, आत्मविश्वास तसेच संवाद कौशल्य या निकषांवर अंतिम निकाल करण्यात आला.
स्पर्धेचा निकाल खालीलप्रमाणे - कोल्हापूर जिल्हा : संकेत जाधव, रुग्वेदी निं•ोरे, शरयू संकपाळ, इंद्रनील पाटील, विनय कांबळे. सांगली जिल्हा : शिवम बिरुले, सुदेश गोसावी, सदफ मोमीन, प्रतीक झेंडे, समृद्धी चौगुले. सातारा जिल्हा : हर्षवर्धन पवार, वेदांत पवार, अवधूत सपकाळ, अथर्व सपकाळ, स्वरूप पाटील.
डिप्लोमा विभागाचे प्रा. अमेय गौरवाडकर, प्रा. अक्षय कुलकर्णी, प्रा. नवाज मुलानी यांनी स्पर्धेचे संयोजन केले. सचिव प्राचार्य आर. डी. सावंत, विश्वस्त प्रा. शामराव पाटील, संचालिका डॉ. सुषमा कुलकर्णी, विभाग प्रमुख डॉ. एच. एस. जाधव, डॉ. एल. एम. जुगुलकर यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.