सांगलीत कृष्णा नदी पडतेय कोरडी, उन्हाळ्याच्या सुरूवातीला महापालिकेवर पाणीपुरवठ्याचे संकट

By शीतल पाटील | Published: February 28, 2023 04:41 PM2023-02-28T16:41:41+5:302023-02-28T16:42:22+5:30

काही दिवस पुरेल एवढे पाणी नदीपात्रात शिल्लक

River Krishna is running dry in Sangli, water supply crisis for the municipal corporation at the beginning of summer | सांगलीत कृष्णा नदी पडतेय कोरडी, उन्हाळ्याच्या सुरूवातीला महापालिकेवर पाणीपुरवठ्याचे संकट

सांगलीत कृष्णा नदी पडतेय कोरडी, उन्हाळ्याच्या सुरूवातीला महापालिकेवर पाणीपुरवठ्याचे संकट

googlenewsNext

सांगली : सांगली व कुपवाड शहरातील साडेचार लाख लोकसंख्येला पाणी पुरविणारी कृष्णा नदी कोरडी पडू लागली आहे. गेल्या दोन दिवसांत नदीपात्रातीलपाणी साठा कमी झाल्याने महपाालिके्च्या पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला आहे. अनेक भागात अपुरा पाणीपुरवठा झाला असून कोयना धरणातून पाणी सोडण्याची मागणी प्रशासनाने पाटबंधारे विभागाकडे केली आहे.

सांगली, कुपवाडसह नदी काठच्या गावांना पिण्याचे आणि शेतीसाठी पाणी कृष्णेतून उचलले जाते. त्याचा उपसा होत राहिल्याने नदीने तळ गाठला. आता काही दिवस पुरेल एवढे पाणी नदीपात्रात शिल्लक राहिले आहे. महापालिकेकडून सांगली व कुपवाड या दोन शहराला कृष्णा नदीतून पाणीपुरवठा केला जातो. नदीने तळ गाठल्याने महापालिकेला अपेक्षित पाणी उचलताना मर्यादा येत आहेत. नदीतील इंटकवेल येथेही पाण्याची पातळी कमी झाली आहेत. त्यामुळे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाची धावपळ उडाली.

परिणामी शहरातील अनेक भागाला अपेक्षित पाणीपुरवठा होऊ शकला नाही. महापालिकेने पाटबंधारे विभागाशी संपर्क साधून कोयनेतून पाणी सोडण्याची विनंती केली आहे. पाटबंधारे विभागानेही पाण्याचे नियोजन सुरू असून बुधवारपर्यंत पाणी पोहचेल, अशी शक्यता वर्तविली आहे.

आता तरी जागे व्हा

उन्हाळ्यात कृष्णा नदी वारंवार कोरडी पडते. शिवाय नदीप्रदुषणही वाढले आहे. त्यासाठी सांगलीकरांना वारणा नदीतून पाणी पुरवठा करण्याची योजना मदनभाऊ पाटील यांनी आखली होती. पण महापालिकेने या योजनेची अंमलबजावणी केली नाही. आता तरी जागे होऊन वारणा पाणी योजनेसाठी आमदार, खासदार, महापालिकेने पाठपुरावा करावा, असे आवाहन युवा मंचाचे जिल्हाध्यक्ष आनंद लेंगरे यांनी केले.

Web Title: River Krishna is running dry in Sangli, water supply crisis for the municipal corporation at the beginning of summer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.