खानापुरात रस्त्याचे काम संथगतीने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:24 AM2021-05-15T04:24:31+5:302021-05-15T04:24:31+5:30

—————————- कर्नाळ लसीकरण केंद्राची पाहणी तुंग : कर्नाळ (ता. मिरज) येथे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने सुरू आसलेल्या कोविड लसीकरण ...

Road work in Khanapur is slow | खानापुरात रस्त्याचे काम संथगतीने

खानापुरात रस्त्याचे काम संथगतीने

Next

—————————-

कर्नाळ लसीकरण केंद्राची पाहणी

तुंग : कर्नाळ (ता. मिरज) येथे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने सुरू आसलेल्या कोविड लसीकरण केंद्राला सांगली काँग्रेसचे शहराध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी भेट दिली. लसीकरणासंदर्भात डॉ. ज्योती पाटील, आरोग्यसेविका यांच्याशी चर्चा केली व अडचणी समजावून घेतल्या. यावेळी सरपंच संध्या कांबळे, उपसरपंच युवराज पाटील, राजू पाटील, गणेश घोरपडे, रोहन एडके, उत्तम पाटील, दिग्विजय माने, महावीर पाटील व कर्नाळमधील ग्रामस्थ उपस्थित होते.

-------------------

सजयनगर भागात कचऱ्याचे साम्राज्य

सांगली : संजयनगर भागात अनेक ठिकाणी रस्त्याकडेला कचरा साचून राहतो आहे. या कचऱ्याचा उठाव नियमितपणे करण्याची मागणी होत आहे.

--------

विहिरीतील पाण्याची पातळी खालावली

सांगली : उन्हाळ्याची तीव्रता हळूहळू वाढते आहे; तर याच दरम्यान, वारणाकाठी बहुसंख्य विहिरींतील पाण्याची पातळी झपाट्याने खालावू लागली आहे. त्यामुळे या भागातील शेतकरी काळजीत आहेत.

-------------

वारणा पात्रात मगरीचे दर्शन

बागणी : वाळवा तालुक्‍यातील बागणी, खोची येथे काही दिवसांपासून वारणा नदीपात्रात सातत्याने मगरीचे दर्शन होत आहे. त्यामुळे नदीकाठावर शेती असलेल्या शेतकरीवर्गात भीतीचे वातावरण आहे. दरम्यान, नदीपात्रात वारंवार मगर दिसत आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात धास्ती आहे. याची दखल घेऊन वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी मगरीचा योग्य बंदोबस्त करण्याची या भागातील शेतकरी वर्गातून मागणी होत आहे.

---------------

मास्कबाबत लोकांत बेफिकिरी

सांगली : कोरोना रोखण्यासाठी मास्कचा वापर करणे अत्यंत महत्त्वाचे आणि गरजेचे असल्याचे शासन तसेच आरोग्य विभाग सातत्याने सांगत आहे. मात्र अद्यापही शहरी तसेच ग्रामीण भागांत बहुसंख्य लोक मास्कचा वापर करण्याबाबत बेफिकीर असल्याचे चित्र आहे.

-------------

हरिपूर रस्त्यावर खड्डेच खड्डे

सांगली : सांगली बसस्थानक परिसरातील शास्त्री चौक ते हरिपूर रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. या रस्त्यावरून नेहमीच वाळू, मुरुमाची वाहतूक मोठ्या प्रमाणावर होत असते. रस्त्यातील या खड्ड्यांमुळे अपघात होण्याची शक्‍यता आहे. रस्ता दुरुस्त करण्याची गरज आहे.

Web Title: Road work in Khanapur is slow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.