सांगली : अचकनहळ्ळीत चोरट्यांनी टाकला दरोडा;दीड लाखाचा ऐवज लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2018 06:11 PM2018-09-20T18:11:50+5:302018-09-20T18:14:01+5:30
अचकनहळळी (ता. जत) येथील सोनेरी वस्तीतील दिलीप तुकाराम शिंदे यांच्या घरावर बुधवारी रात्री दीड ते अडीचच्या दरम्यान दरोडा टाकून चोरट्यांनी १ लाख ६१ हजार ५०० रुपयांचा ऐवज लुटून नेला. याबाबत दिलीप शिंदे यांनी गुरुवारी जत पोलिसात फिर्याद दिली.
जत : अचकनहळळी (ता. जत) येथील सोनेरी वस्तीतील दिलीप तुकाराम शिंदे यांच्या घरावर बुधवारी रात्री दीड ते अडीचच्या दरम्यान दरोडा टाकून चोरट्यांनी १ लाख ६१ हजार ५०० रुपयांचा ऐवज लुटून नेला. याबाबत दिलीप शिंदे यांनी गुरुवारी जत पोलिसात फिर्याद दिली.
दिलीप शिंदे यांच्या घरात रात्री दीड ते अडीच वाजण्याच्या सुमारास अंदाजे २५ ते ३० वयोगटातील सडपातळ व मध्यम बांध्याचे ८ ते ९ चोरटे शिरले. ते मराठी व हिंदी भाषा बोलत होते. त्यांचा आवाज ऐकून दिलीप शिंदे जागे झाले असता, चोरट्यांनी लोखंडी गज, सळई, काठी व चाकूच्या साहाय्याने धमकावत दिलीप शिंदे, सिंधुताई शिंदे, शालन शिंदे, दत्तात्रय शिंदे, तुकाराम शिंदे यांना मारहाण केली. यात या पाच जणांच्या डोक्यावर, छातीवर, पाठीवर, मानेवर गंभीर जखमा झाल्या आहेत.
मारहाण करत असताना चोरट्यांनी सिंधुताई शिंदे यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावून घेतले. यावेळी सोन्याचे गंठण, मोहनमाळ, सर, कर्णफुले असे मिळून सहा तोळे तीन ग्रॅमचे सोन्याचे दागिने, चार हजार रुपये, एक मोबाईल असा मिळून एक लाख एकसष्ट हजाराचा ऐवज लुटून नेला. अधिक तपास जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजू ताहसीलदार करत आहेत.