आरिफ शेख- : करोनाच्या रुग्ण सेवेच्या मदतीसाठी 'रोबोट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2020 02:29 PM2020-05-06T14:29:08+5:302020-05-06T14:31:03+5:30

रोबोट मध्ये कॅमेरा व रेकॉर्डर आहे. आयसोलेशन कक्षा बाहेर थांबून डॉक्टर आतील कोरोना रुग्णासोबत रोबोटद्धारे संवाद साधू शकतात. कॅमेर्‍यातून परिस्थिती पाहू शकतात. मोबाईल अ‍ॅपद्धारे या रोबोटला निर्देश देता येतात. रुग्णसेवकांच्या मदतीसाठी हा 'रोबोट' महत्वाची भूमिका बजावणार असल्याचे अरिफ शेख यांनी सांगितले .शेख यांनी यापूर्वीही विविध उपकरणे तयार केली आहेत.

'Robot to help Corona's patient service | आरिफ शेख- : करोनाच्या रुग्ण सेवेच्या मदतीसाठी 'रोबोट

आरिफ शेख- : करोनाच्या रुग्ण सेवेच्या मदतीसाठी 'रोबोट

Next
ठळक मुद्देसांगलीच्या वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयातील संशोधकाची निर्मिती

सदानंद औंधे
मिरज :- कोरोना रुग्णांवर उपचार करताना वैद्यकीय कर्मचार्‍यांना संसर्गाचा धोका टाळण्यासाठी डॉक्टर व वैद्यकीय कर्मचार्‍यांच्या मदतीसाठी 'रोबोट' तयार करण्यात आला आहे. सांगलीतील वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयातील अरिफ शेख या संशोधकाने तयार केलेल्या रोबोट मध्ये ऑटोमॅटिक ऑडिओ व व्हिडीओ कॉन्फरन्सची सोय आहे. शेख यांनी छोटया व मोठ्या आकारातील दोन रोबोट अत्यंत कमी खर्चात तयार केले आहेत.

कोरोना संसर्ग वाढत असल्याने सर्वाना खबरदारी घ्यावी लागत आहे. शारिरिक अंतर ,मास्क ,सॅनिटायझरचा वापर व लॉकडाऊन या सर्वसामान्यांसाठी उपाययोजना करण्यात येत आहेत. मात्र कोरोना रुग्णावर उपचार करणाऱ्या डॉक्टर व परिचारकांना संसर्गाचा मोठा धोका आहे. आयसोलेशन वॉर्ड मध्ये पीपीई किट , हॅन्डग्लोज, एन 95 मास्क, गॉगल्स घालून त्या कक्षात काम करावे लागते.

रुग्णांवर उपचार किंवा रुग्णांना ओषधे देणे, जेवण देणे, त्यांच्यासोबत संवाद साधण्यासाठी सर्व सुरक्षा साधनांचा वापर करुन रुग्णांच्या जवळ जावे लागते. उपचारावेळी डॉक्टर व रुग्णांना कमीत कमी संपर्क यावा यासाठी रुग्ण सेवा करणारा 'रोबोट' वालचंद महाविद्यालयातील संशोधक आरिफ शेख यांनी तयार केला आहे. आरिफ शेख हे वालचंद महाविद्यालयात प्रॉडक्ट डेव्हलपमेंट या विभागांत सहाय्यक संशोधक म्हणून काम करतात.

रुग्णसेवेसाठी एक छोटा व एक मोठा असे दोन रोबोट तयार करण्यात आले आहेत. मोठा रोबोट 15 ते 25 किलो वजना पर्यंतच्या वस्तू वाहून नेऊ शकतो. लहान रोबोट 5 ते 10 किलो वजनाच्या वस्तू नेऊ शकतो. यात डिजिटल कॅमेरा व डिजिटल ऑडिओ रेकॉर्डिंग , ऑटोमॅटिक ऑडिओ व व्हिडीओ कॉन्फरन्सची सोय आहे. रोबोट मध्ये कॅमेरा व रेकॉर्डर आहे. आयसोलेशन कक्षा बाहेर थांबून डॉक्टर आतील कोरोना रुग्णासोबत रोबोटद्धारे संवाद साधू शकतात. कॅमेर्‍यातून रुग्णाची परिस्थिती पाहू शकतात. मोबाईल अ‍ॅपद्धारे या रोबोटला निर्देश देता येतात.

विलगीकरण कक्षात ठेवलेल्या संशयित रुग्णांच्या सेवेसाठीसुद्धा या रोबोटचा वापर होऊ शकतो.देशात व राज्यात अन्यत्रही रुग्णसेवा करणारे रोबोट तयार करण्यांत आले आहेत .
मात्र त्यांचा खर्च लाखांपर्यंत आहे .शेख यांनी तयार केलेल्या इको फ्रेंडली रोबोटच्या निर्मितीसाठी केवळ ३० हजार रुपये खर्च आला आहे.शासकिय आरोग्य विभागाकडून या रोबोटला मागणी असून या रोबोटची मोठ्या प्रमाणात निर्मिती करण्यांत येणार असल्याचे शेख यांनी सांगितले .

वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयाने आतापर्यंत पूर, नैसर्गिक आपत्ती किवा कोणत्याही आपत्ती वेळी, समाज उपयोगी संशोधन व उपयुक्त साधनांची निर्मिती केली आहे., सद्यःस्थितीतही कोरोना आपत्तीप्रसंगी सॅनिटायझर फवारणी सायकल व रोबोट अशी उपकरण येथे तयार करण्यांत आली आहेत. वैद्यकीय क्षेत्रात उपयोगी ठरणारा रोबोट अत्यंत कमी खर्चात बनवण्यात शेख यांनी यश मिळविले आहे.

करोना रुग्णसेवकांच्या मदतीसाठी हा 'रोबोट' महत्वाची भूमिका बजावणार असल्याचे अरिफ शेख यांनी सांगितले .शेख यांनी यापूर्वीही विविध उपकरणे तयार केली आहेत.

 

Web Title: 'Robot to help Corona's patient service

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.